Home > Entertainment > United Kacche सुनील ग्रोवरचा हा ट्रेलर पाहिलात तर तुम्हीही म्हणाल,"हा तर..."

United Kacche सुनील ग्रोवरचा हा ट्रेलर पाहिलात तर तुम्हीही म्हणाल,"हा तर..."

United Kacche सुनील ग्रोवरचा हा ट्रेलर पाहिलात तर तुम्हीही म्हणाल,हा तर...
X

कपिल शर्मा शो मध्ये मिस्टर गुलाटी भूमिका साकारणारा सुनील ग्रोवर हा विनोदा पेक्षा हल्ली त्याच्या अभिनयामुळे जास्त ओळखला जातो आहे .सुनील ग्रोवर यांनी फार कमी काळात प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. नुकताच "युनायटेड कच्चे" नावाचा नवीन सिनेमा येत आहे ज्यामध्ये सुनील ग्रोवरने मुख्य नायकाची भूमिका स्वीकारली आहे.

मानव शहा यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. "Tango"असं सुनील ग्रोवरचे नाव आहे .तर डेझी पटेल म्हणून सपना पब्बी हिने मुख्य नायिकेची भूमिका स्वीकारली आहे .या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये या दोघांची लव केमिस्ट्री सुद्धा दाखवली आहे .ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

या ट्रेलरचा खास आकर्षण म्हणून निखिल विजय ची भूमिका सुद्धा लोक पसंत करत आहेत. दोन विनोदी अभिनेते एकत्र येऊन काय मजा आणू शकतात ?हेच या ट्रेलर मधून दिसून येत आहे

सुनील ग्रोवर हा एक हरहुन्नरी कलाकार म्हणून ओळखला जातो .आता त्याच्या या चित्रपटामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे .परदेशात जाऊन केलेली सुनील ग्रोवर याची ही पळापळ प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे .एक सामान्य माणूस ते अभिनेता इथपर्यंतचा सुनील ग्रोवरचा हा प्रवास निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे.हा ट्रेलर पाहून तुम्हीही म्हणाल ,हा तर जबरदस्त गाजणार...

Updated : 25 March 2023 8:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top