Home > Entertainment > या प्रसिद्ध अभिनेत्री वयानुसार कश्या बदलल्या ? आता नक्की दिसतात कश्या ?

या प्रसिद्ध अभिनेत्री वयानुसार कश्या बदलल्या ? आता नक्की दिसतात कश्या ?

या प्रसिद्ध अभिनेत्री वयानुसार कश्या बदलल्या ? आता नक्की दिसतात कश्या ?
X

१)रेखा गणेशन


रेखाचे मूळ नाव भानुरेखा गणेशन आहे. ती हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिने 1970 मध्ये सावन भादोन या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली. तिने एकशे ऐंशीहून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. रेखाच्या सौन्दर्यासोबत तिच्या अभिनयाची जादू आजही अनेक चाहत्यांना घायाळ करते.बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्याशी रेखाचे नाव नेहमी जोडले जाते .ऑनस्क्रीन त्यांची जोडी पाहण्यासाठी लोक वेडे व्हायचे .

२)जया बच्चनजया बच्चन या त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या आणि त्यांनी भारतीय प्रेक्षकांना गुड्डी, अभिमान, मिली, शोले आणि जंजीर यांसारखे अनेक ब्लॉकर चित्रपट सादर केले. तिने अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न केले आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या देखील खूप प्रसिद्ध आहेत. जया बच्चन यांनीही राजकारणात प्रवेश केला आणि समाजवादी पक्षातून राज्यसभेच्या खासदार झाल्या. जया बच्चन नेहमीच चर्चेत राहत असतात .

३) जया प्रदाजया प्रदा या त्यांच्या काळातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री होती. तिने दाक्षिणात्य तसेच बॉलिवूड इंडस्ट्रीत आपले कौशल्य दाखवले. अशी हि अभिनेत्री आणि राजकारणी आजपर्यंत लोकप्रिय आहे.

४) राखी गुलजारराखी सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक होती आणि तिने चार दशके बॉलिवूड इंडस्ट्रीत काम केले. तिला तीन फिल्मफेअर पुरस्कार आणि एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला होता.

५)शर्मिला टागोरशर्मिला टागोर ही तिच्या काळातील सर्वात बोल्ड अभिनेत्री मानली जाते. तिने बॉलिवूडसोबतच बंगाली सिनेमातही काम केले आहे. चित्रपटातील तिच्या निर्दोष अभिनयामुळे तिला दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. 2004 ते 2011 या काळात तिने सेन्सॉर बोर्डाचेही नेतृत्व केले.

Updated : 28 March 2023 10:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top