Home > Entertainment > सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री झीनत अमान यांच्या वाढ दिवसानिमित्त...

सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री झीनत अमान यांच्या वाढ दिवसानिमित्त...

सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री झीनत अमान यांच्या वाढ दिवसानिमित्त...
X

सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री म्हणून लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) यांचा आज वाढदिवस. 70 आणि 80 च्या दशकातील चित्रपटात त्यांनी असे काम केले की, महिलांसाठी असलेल्या सर्व स्टिरियोटाइप्स मोडून काढल्या आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.

झीनत अमान यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1951 रोजी मुंबईत झाला. त्यांची आई महाराष्ट्रीयन ब्राह्मण होती आणि वडील अमानुल्ला खान भोपाळच्या राजघराण्यातील होते. अमानुल्ला खान यांनी 'मुघल-ए-आझम' आणि 'पाकीजा' सारख्या चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. लेखक म्हणून त्यांनी आपले नाव 'अमान' ठेवले होते. झीनत अमानचे खरे नाव झीनत खान आहे, मात्र, चित्रपटांत येण्यापूर्वीच झीनत यांनी त्यांच्या नावासोबत वडिलांचे जोडले.

झीनत अमान यांच्या पालकांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर झीनत त्यांच्या आईसोबत राहू लागल्या. वडिलांचे निधन झाले तेव्हा झीनत 13 वर्षांच्या होत्या. यानंतर त्यांच्या आईने हेन्झ नावाच्या जर्मन माणसाशी लग्न केलं. झीनत आणि तिची आई दोघीही जर्मनीला गेल्या त्यामुळे झीनत यांच्याकडे आता भारताव्यतिरिक्त जर्मनीचे नागरिकत्व आहे.

झीनत अमान त्यांचे शिक्षणही वेगवेगळ्या ठिकाणी झाले. झीनत यांचे सुरुवातीचे प्राथमिक शिक्षण पाचगणी येथे झाले. यानंतर त्या आईसोबत परदेशात गेल्यानंतर त्यांना लॉस एंजेलिस येथील दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठात शिक्षणासाठी पाठवण्यात आले. मात्र, त्यांना आपले शिक्षण पूर्ण करता आले नाही.

झीनत यांनी वेगवेगळ्या ठिकाणची संस्कृती आणि चालीरीती पाहिल्या होत्या. ज्याने त्यांना जग समजू लागले. ग्रॅज्युएशन पूर्ण केले नसतानाही, त्या देशात परतल्या आणि फेमिना मासिकासाठी लिहू लागल्या. एक प्रकारे झीनत यांनी पत्रकार म्हणून पहिली नोकरी सुरू केली होती.

फेमिनासारख्या फॅशन मॅगझिनमध्ये काम करताना झीनत अमान यांना स्वतः फॅशन इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करायचा होता. आणि तेथूनच त्यांनी मॉडेलिंगला सुरुवात केली. झीनत दिसायला सुंदर होत्या, त्यामुळे त्यांना मॉडेलिंगमध्येही त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपटत क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी, 1970 मध्ये, वयाच्या 19 व्या वर्षी, झीनत यांनी फेमिना मिस इंडिया आणि मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल या किताब मिळवला.. हे विजेतेपद पटकावणाऱ्या झीनत पहिल्या दक्षिण आशियाई महिला ठरल्या.त्यानंतर झीनत देश-विदेशातील अनेक प्रतिष्ठित मासिकांच्या मुखपृष्ठावर झळकल्या.

झीनत अमान यांच्या सुरुवातीच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. सततच्या फ्लॉप चित्रपटांमुळे त्यांनी ही इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, 'हरे रामा हरे कृष्णा' मध्ये देव आनंदसोबत काम करण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांनी आपला विचार बदलला. आणि तिथूनच झीनत यांनी स्वतःची ओळख निर्माण करायला सुरुवात केली. झीनत अमान यांनी 'यादों की बारात', 'रोटी कपडा और मकान', 'वॉरंट', 'धरम वीर', 'छैला बाबू', 'सत्यम शिवम सुंदरम' यांसारख्या अनेक चित्रपटांत उत्तम काम केले.

Updated : 19 Nov 2021 3:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top