Home > Entertainment > बिगबॉस मधील हि स्पर्धक आता दिसणार सलमानसोबत चित्रपटात...

बिगबॉस मधील हि स्पर्धक आता दिसणार सलमानसोबत चित्रपटात...

बिगबॉस मधील हि स्पर्धक आता दिसणार सलमानसोबत चित्रपटात...
X

'बिग बॉस 13' ('Bigg Boss 13') ची फेम पंजाबी गायिका आणि अभिनेत्री शहनाज गिल (Shahnaz Gill) अनेकदा मीडियाच्या चर्चेत असते. शहनाज सोशल मीडियावरही खूप सक्रीय असते. ती दररोज तिच्या चाहत्यांसाठी पोस्ट शेअर करत असते. शहनाजने आताच सलमान खान सोबत एका नवीन येणाऱ्या चित्रपटाच्या गाण्यात काम करताना दिसली आहे. आणि त्या गाण्याच सोशल मीडीयावर प्रमोट करताना पाहायला मिळते.

सलमान खानच्या (Salman Khan) 'किसी का भाई किसी का जान' ('Kisi Ka Bhai Kisi Ka Jaan') या चित्रपटातील नवीन गाणे आले आहे. सलमानच्या चित्रपटातील 'बिल्ली बिल्ली' ('Billi Billi') या गाण्याच्या प्रमोशनसाठी शहनाजने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आणि लोकांना तो व्हिडिओ खूप आवडत आहे. बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमानच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाची प्रचंड क्रेझ आहे.

चाहत्यांना वाटतं सलमाननंतर जर कोणती गोष्ट सर्वात जास्त चर्चेत असेल तर ती शहनाजची. 'बिल्ली बिल्ली' या गाण्यात शहनाज असल्याची चर्चा ट्विटरवर (Twitter) होत आहे. दरम्यान, या चित्रपटाचे नवीन गाणे 'बिल्ली बिल्ली' हे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यामध्ये सलमान खान अभिनेत्री पुजा हेगडे (Pooja Hegde) सोबत बिनधास्त डान्स करताना दिसत आहेत. या दोघांच्या जोडीला चाहते खुप पसंद करत आहेत. त्याचबरोबर चित्रपटाच्या टीममधील अनेक अभिनेते आणि अभिनेत्री वेगवेगळ्या पद्धतीने या गाण्याचे प्रमोशन करत आहेत.

अशा परिस्थितीत 'बिल्लीबिल्ली' या गाण्याचे प्रमोशन करण्यात शहनाज कुठे मागे राहणार? या गाण्याचे त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रमोशन केले आहे. ब्लॅक कलरचा ड्रेस परिधान करून त्याने या गाण्याचा व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. शहनाजचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिच्या या व्हिडिओवर त्याचे चाहते खूप प्रेम करत आहेत.

सलमानच्या या चित्रपटाचे गाणे २ मार्च रोजी प्रदर्शित झाले. याआधी 'नयो लगदा' (Naiyo Lagda) हे गाणे रिलीज झाले होते, जे लोकांना खूप आवडले होते. शहनाज गिल सलमानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण करत आहे. 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट 24 एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमान आणि पूजासोबत शहनाज गिल, पलक तिवारी (Palak Tiwari), जगपती बाबू (Jagpati Babu) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Updated : 11 March 2023 11:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top