Home > Entertainment > काश्मीर फाइल्स पाहिल्यावर कंगना म्हणतेय आता कुठे बॉलिवूडची पापं...

काश्मीर फाइल्स पाहिल्यावर कंगना म्हणतेय आता कुठे बॉलिवूडची पापं...

वादग्रस्त अभिनेत्री कंगना रणौतने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या द कश्मीर फाइल्स या चित्रपटावर आपली प्रतिक्रीया दिली आहे.

काश्मीर फाइल्स पाहिल्यावर कंगना म्हणतेय आता कुठे बॉलिवूडची पापं...
X

बॉलीवुडची वादग्रस्त अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच वेगवेगळ्या मुद्द्यांवरून चर्चेत असते. मागील काही दिवसांपासून ती सातत्यानं 'द काश्मीर फाइल्स'वर काही ना काही पोस्ट शेअर करतेय. या सिनेमावर प्रतिक्रिया देत आहे. कंगनाने नुकताच हा चित्रपट पाहिला असून तिने या चित्रपटबाबत माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय झालाय. कंगनाने या व्हिडीओमध्ये पुन्हा एकदा बॉलिवूडकरांवर निशाणा साधलाय.

'द काश्मीर फाइल्स' चित्रपट पाहिल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना कंगना म्हणाली, 'खूपच उत्तम चित्रपट आहे. मी चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करते. आज त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीची पापं धुवून टाकली. सगळ्या बॉलिवूडकरांची पापं धुतली गेलीत इतका चांगला चित्रपट तयार केला गेलाय. हा चित्रपट खरंच कौतुकास पात्र आहे. त्यामुळे अजूनही जे कलाकार लपून बसले आहेत त्यांनी समोर येऊन चित्रपटाचं कौतुक करायला हवं, प्रमोशन करायला हवं. चांगल्या कथा नसलेल्या चित्रपटांना प्रमोट करता मग चांगली कथा असलेला चित्रपट कर नक्कीच प्रमोट करू शकता.'

Updated : 15 March 2022 12:11 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top