Home > Entertainment > 'द इम्मॉर्टल अश्वत्थामा' विकी कौशलने केली नव्या चित्रपटाची घोषणा!

'द इम्मॉर्टल अश्वत्थामा' विकी कौशलने केली नव्या चित्रपटाची घोषणा!

द इम्मॉर्टल अश्वत्थामा विकी कौशलने केली नव्या चित्रपटाची घोषणा!
X

अभिनेता विकी कौशल त्याच्या फॅन्ससाठी नव्या वर्षात नव्या चित्रपटाची भेट घेऊन आलाय. या चित्रपटाचं पोस्टर त्यानं त्याच्या ट्विटरवरून ट्विट करत त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

भारतीय सेनेने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारीत 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक' हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर तुफान गाजला होता. हा चित्रपट ११ जानेवारी २०१९मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आज २ वर्ष पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने अभिनेता विकी कौशलने त्याच्या आगामी चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित केला आहे. हा पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

विकीच्या या आगामी चित्रपटाचे नाव 'द इम्मॉर्टल अश्वत्थामा' असं आहे. हा चित्रपट महाभारतातील एका पात्रावर आधारीत असल्याचं म्हटलं जात आहे. हा चित्रपट सायन्स फिक्शन आणि थ्रिलर आहे. विकीने दोन पोस्टर ट्वीट केले आहेत. "मी अत्यंत उत्साही आणि आनंदी आहे.

उरी – द सर्जिकल स्ट्राइकला दोन वर्ष पूर्ण झाल्याचे निमित्त साधत तुम्हाला द इम्मॉर्टल अश्वत्थामाची एक झलक दाखवत आहे. या टीमसोबत पुन्हा एकदा काम करण्यासाठी मी आणखी प्रतीक्षा करू शकत नाही", अशा आशयाचं कॅप्शन विकीने त्या पोस्टरला दिलं आहे.

Updated : 12 Jan 2021 11:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top