Home > Entertainment > तो क्षण माझ्या कुटुंबासाठी भावनात्मक: कमला हॅरीस यांच्या निवडीवर प्रियंका चोप्राने दिली प्रतिक्रिया

तो क्षण माझ्या कुटुंबासाठी भावनात्मक: कमला हॅरीस यांच्या निवडीवर प्रियंका चोप्राने दिली प्रतिक्रिया

तो क्षण माझ्या कुटुंबासाठी भावनात्मक: कमला हॅरीस यांच्या निवडीवर प्रियंका चोप्राने दिली प्रतिक्रिया
X

बॉलीवुड अभिनेत्री आणि देसी गर्ल प्रियंका चोप्रा हिने भारतीय चित्रपट जगतात तर स्वतःच्या कतृत्वाने ठसा उमटवला आहेच, मात्र हॉलीवुडमध्येही तिने तिच्या कर्तृत्वाची छाप सोडली आहे. अमेरिकेच्या नवनियुक्त उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस या ही भारतीय वंशाच्या असल्याने अमेरिकेतील एका वृत्तवाहीनीवरील एका मुलाखतीमध्ये प्रियंकाला या बद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.Priyanka

कमला हॅरिस यांच्या बद्दल प्रतिक्रिया देताना ती म्हणाली, 'खूप साऱ्या गोष्टी आहेत. कमला हॅरिस यांची नियुक्ती हा माझ्यासाठी, माझ्या मित्र-मैत्रिणींसाठी आणि माझ्या कुटुंबासाठी भावनात्मक क्षण होता. भारतासारख्या देशातून मी आहे, जिथे शासकीय सेवेत तसेच राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान यांसारख्या महत्वांच्या पदांवर महिलांना पाहिलंय...भारतीय महिलांचे क्लब अमेरिकेत स्वागत आहे'

प्रियंकाने दिलेली प्रतिक्रिया ही भारतीयांसाठी अभिमानास्पद आहेच, पण त्याच बरोबरीने परदेशात गेल्यानंतरही तिचं आपल्या देशावर असलेलं प्रेम तिच्या प्रतिक्रियेतून भरून येताना दिसल. प्रियांकाने २०१८ मध्ये हॉलिवूड गायक निक जोनसशी लग्न केलं. यानंतर दोघंही लॉस एन्जेलिस इथे राहत आहेत. प्रियंका लग्न झाल्यापासून अमेरिकेतच आहे. त्यामुळे भारतीय महिला या अटकेपार जाऊनही आपला देश विसरत नाहीत हेच दिसून येत.

Updated : 1 Feb 2021 6:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top