Home > Entertainment > "तुमचं जगणंच मी अवघड बनवून ठेवेल" कंगनाची ट्वीटरला धमकी

"तुमचं जगणंच मी अवघड बनवून ठेवेल" कंगनाची ट्वीटरला धमकी

ट्विटरचा वापर करुन वारंवार वादग्रस्त विधानं करत असल्यामुळे कंगनावर ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे चिडलेल्या कंगनाने थेट ट्वीटरचे CEO जॅक डोर्से यांनाच धमकी दिली आहे.

तुमचं जगणंच मी अवघड बनवून ठेवेल कंगनाची ट्वीटरला धमकी
X

ट्विटरने सध्या आपल्या धोरणांची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेते झालेल्या हिंसाचारानंतर ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाउंटही बंद केले होते. तीच वेळ कंगनावर ओढवली आहे. ट्विटरने तात्पुरते निर्बंध आणल्यानंतर कंगनाने ट्विटरचे सीईओ जॅक डोर्से यांनाच धमकी दिली आहे.

कंगनानं ट्विटरवर लिहिलं की, "लिबरल लोक आपले काका जॅक यांच्याकडे जाऊन रडत आहेत आणि माझ्या अकाउंटवर काही काळासाठी निर्बंध आणले आहेत. ते मला धमक्याही देत आहेत. ट्विटरवरच अकाउंट म्हणजेच माझी व्हर्चुअल ओळख देशासाठी शहीद होऊ शकते. मात्र, माझं रिलोडेड देशभक्तीचं व्हर्जन सिनेमांद्वारे पुन्हा पुन्हा परत येईल. याद्वारे 'तुमचं जगणंच मी अवघड बनवून ठेवेल'"

का झाली कारवाई?

तांडव वेब सीरिजवर सुरु असलेल्या वादात कंगनाने उडी घेत प्रतिक्रिया दिली होती. तांडवच्या निर्मत्यांविषयी वादग्रस्त ट्विट केलं होतं. त्यानंतर कंगनाचं अकाऊंटवर कारवाई करण्यासाठी #SuspendKanganaRanaut असा ट्रेंड सुरु झाला होता.


Updated : 21 Jan 2021 4:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top