Home > Entertainment > सलमान खान प्रेमात पडला आणि गाणं सुद्धा गायला ,कुणासाठी ? वाचा...

सलमान खान प्रेमात पडला आणि गाणं सुद्धा गायला ,कुणासाठी ? वाचा...

सलमान खान प्रेमात पडला आणि गाणं सुद्धा गायला ,कुणासाठी ? वाचा...
X

बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खानचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'किसी का भाई किसी की जान' चे 'जी रहे थे हम' हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. विशेष म्हणजे हे गाणे स्वतः भाईजानने गायले आहे. सलमान खान आणि पूजा हेगडे यांची अप्रतिम केमिस्ट्री रोमँटिक ट्रॅकमध्ये या गाण्यात आणि चित्रपटात पाहायला मिळते.

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता आहे. सोमवारी, सलमान खानच्या आगामी चित्रपटातील 'जी रहे थे हम' या रोमँटिक गाण्याचा टीझर रिलीज झाला. 'किसी का भाई किसी की जान'मधील या रोमँटिक गाण्यात बी-टाउनची स्टार पूजा हेगडे ही सलमानसोबत रोमान्स करताना दिसत आहे. यासोबतच भाईजानच्या 'जी रहे है हम' या गाण्याची रिलीज डेट सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली आहे.

सलमान खानने सोमवारी त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटातील 'जी रहे थे हम' गाण्याचा टीझर पोस्ट केला. या टीझरमध्ये सलमान खान लांब केसांमध्ये जबरदस्त दिसत आहे, तर पूजा हेगडेने तिच्या सौंदर्याने आणि किलर स्टाईलने चाहत्यांची मने जिंकली आहेत. या टीझरमध्ये तुम्ही फॉल इन लव्हचे बोल स्पष्टपणे ऐकू शकता. तसेच या 'जी रहे थे हम'च्या टीझरमध्ये सलमान खान आणि पूजा हेगडे यांच्यातील केमिस्ट्री पाहायला मिळते.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे सलमान खानने हे गाणे स्वतःच्या आवाजात सादर केले आहे. सलमान खानने टीझरसोबत 'जी रहे थे हम' या त्याच्या लेटेस्ट गाण्याची रिलीज डेट जाहीर केली आहे. सलमानने सांगितले की, किसी का भाई किसी का जानमधील तिसरे गाणे 21 मार्चला म्हणजेच बुधवारी रिलीज होणार आहे. यापूर्वी 'किसी का भाई किसी की जान'मधील 'नईयो लगदा' आणि 'बिल्ली बिल्ली' हे गाणे हिट झाले आहेत.

Updated : 22 March 2023 9:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top