Home > Entertainment > "ज्यांनी धर्मासाठी मनोरंजन विश्व सोडलं त्यांना आता पश्चाताप झाला असेल"

"ज्यांनी धर्मासाठी मनोरंजन विश्व सोडलं त्यांना आता पश्चाताप झाला असेल"

ज्यांनी धर्मासाठी मनोरंजन विश्व सोडलं त्यांना आता पश्चाताप झाला असेल
X

आपल्या पुस्तकांमुळे नेहमीच चर्चेत असलणाऱ्या लेखिका तस्लीमा नसरीन आता त्यांच्या ट्वीटमुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये धर्मासाठी मनोरंजन विश्व सोडलेल्यांना चांगलंच झापलं आहे. महत्वाचं म्हणजे यात त्यांनी कलाकरांची नावं घेतली आहेत.

काय आहे ट्वीट?..

"विनोद खन्ना, सुचित्रा सेन, अनु अग्रवाल, बरखा मदन, सना खान, जायरा वसीम, शबाना, व्हॅनिटी, ख्रिस टकर, अँगस जोन्स, नरगिस, कर्क कॅमेरून, मॉन्टेल जॉर्डन, जुनैद जमशेद, कॅट स्टीव्हन्स … या सर्वांनी धर्मासाठी मनोरंजन विश्व सोडले. धर्म हे मनोरंजन व्यवसायापेक्षा चांगले स्थान नाही. काही लोकांना याबद्दल पश्चातापही झाला असेल." असं तस्लीमा नसरीन यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.


Updated : 5 Dec 2020 11:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top