Home > Entertainment > आणि पुन्हा तब्बू बनली पोलीस अधिकारी ...

आणि पुन्हा तब्बू बनली पोलीस अधिकारी ...

आणि पुन्हा तब्बू बनली पोलीस अधिकारी ...
X


तब्बू ही बॉलीवूड मधील अभिनेत्री नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकत आली आहे. तिचा अभिनय असो अथवा तिचे व्यक्तिमत्व नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतं. दृश्यम सिनेमातील तब्बूची IGची भूमिका आणि याआधी तिने केलेल्या पोलिसाच्या भूमिकेत नेहमीच एक नवीन ऊर्जा दिसली आहे.

दृश्यम आणि दृश्यम द्वितीयच्या यशानंतर आता तब्बू अजय देवगन सोबतच एका नवीन चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव "भोला" असं आहे. या चित्रपटामध्ये तब्बू आहे एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. भोला चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे . या चित्रपटामध्ये "पोलीस वर्दीच्या मागे एक माणूस सुद्धा दडलेला असतो",असा तब्बूचा डायलॉग सध्या चर्चेत आहे.

तेरा दिवसांपूर्वीच भोला चित्रपटाचा टीजरआला होता.यामध्ये अजय देवगन आणि तब्बूच्या एन्ट्री ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे .तीन दिवसांपूर्वी भोला चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा प्रदर्शित झाला आहे . यामध्ये तब्बू आणि अजय देवगन या दोघांचीही भूमिका तडफदार घेतली आहे. 30 मार्चला हा चित्रपट सिनेमागृहात दाखवला जाणार आहे.त्यामुळे दृश्यम चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर "भोला" हा चित्रपट काय कमाल करणार ? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

Updated : 6 Feb 2023 7:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top