Home > News > तापसी पन्नूला वीज ‘बिलाचा’ झटका

तापसी पन्नूला वीज ‘बिलाचा’ झटका

तापसी पन्नूला वीज ‘बिलाचा’ झटका
X

लॉकडाउनमध्ये प्रमाणापेक्षा अधीक वीज बिल आल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. वीज कंपन्यांच्या कारभाराचा फटका सामान्य माणसांसोबतच आता अभिनेत्री तापसी पन्नूला ही बसला आहे. आपल्या वीज बिलाचा फोटो ट्वीटरवर पोस्ट करत तिने या संदर्भात माहिती दिली.

“हे त्या अपार्टमेंटचं बिल आहे ज्यात कुणी रहात नाही. आठवड्यातून एकदा आम्ही तिथं जातो ते ही साफसफाईसाठी. लॉकडाउन काळात मी कोणतही नवीन उपकरण खरेदी केलेलं नाही. त्यासोबतच मी वीजेचा वापरही फार कमी करते. अदानी कंपनी तुम्ही कोणत्या पध्दतीची वीज आमच्यासाठी खर्च करता? आमच्या नकळत कुणी या अपार्टमेंटमध्ये रहात नाही नं? या गोष्टीची आता मला चिंता वाटतेय. ही बाब तुम्ही समोर आणल्यामुळं मी तुमची आभारी आहे.” असं ट्वीट तापसीने केलं आहे.

36 हजार रुपये आलेल्या वीज बिलाचा फोटो तापसीने ट्वीटरवर टाकल्याने तो व्हायरल होत आहे.

Updated : 29 Jun 2020 5:00 AM GMT
Next Story
Share it
Top