Home > Entertainment > 'शेल्फी काढा' म्हणत सोशल मिडीयावर धुमाकूळ घालतेय ही प्रसिध्द अभिनेत्री!

'शेल्फी काढा' म्हणत सोशल मिडीयावर धुमाकूळ घालतेय ही प्रसिध्द अभिनेत्री!

शेल्फी काढा म्हणत सोशल मिडीयावर धुमाकूळ घालतेय ही प्रसिध्द अभिनेत्री!
X

सध्या सोशल मिडीयावर शेल्फी काढा हे गाणं खूप प्रसिध्द होतंय फक्त ५ दिवसांत हे गाणं खूप व्हायरल झालं आहे. युट्यूबवर या गाण्याला जवळपास सव्वा पाच लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत. हे गाणं इतकं व्हायरल होण्यामागे या गाण्याच्या व्हिडीओमधील अभिनेत्री माधूरी पवार हिचा बोल्ड अंदाज आहे. या गाण्यामध्ये माधूरी आणि विशाल यांची बोल्ड केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळत आहे. माधूरीची या गाण्यातील वेशभूषा कमालीची हॉट आहे ज्यामुळे तिचा चाहतावर्ग सुध्दा आता सेल्फी काढा हे गाणं गुणगुणतोय.


या गाण्याची निर्मिती निलेश भाटे आणि Marathi Musik Town यांनी केली आहे. या गाण्याचे दिग्दर्शन ओमकार माने यांनी केलं आहे. तर हे गाणं जिगर मराठी आणि Marathi Musik Town यांनी सादर केलं आहे. हे गाणं राहूल काळे यांनी लिहीलं असून त्याला विजय भाटे यांनी लयबध्द केलंय तर सोनाली सोनावणे हिने त्या गाण्याला आपला स्वर साज चढवला आहे.

कोण आहे माधूरी पवार?

अभिनेत्री माधूरी पवार झी युवा वाहिनीवरील अप्सरा आली या कार्यक्रमाची विजेती राहिली आहे. याशिवाय तिने झी मराठी वाहिनीवरील तूझ्यात जीव रंगला या सुप्रसिद्द मालिकेत वहिनीसाहेब ही भुमिका साकारली होती. या भुमिकेसाठी तिने धनश्री काडगावकर हिला रीप्लेस केले होते आणि उत्तम प्रकारे आपली भूमिका वठवली होती. तसेच तिने झी मराठीवरीलच देवमाणूस या आणखी एका प्रसिध्द मालिकेत डॅशिंग चंदा हे पात्र साकारले होते. माधूरीचा चाहता वर्ग बराच मोठा आहे. Instagram वर तिचे दीड लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

Updated : 27 Nov 2021 12:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top