Home > Entertainment > शाहरुखची मुलगी परतणार मायदेशी... फोटो शेअर करत म्हणाली..

शाहरुखची मुलगी परतणार मायदेशी... फोटो शेअर करत म्हणाली..

शाहरुखची मुलगी परतणार मायदेशी... फोटो शेअर करत म्हणाली..
X

शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचे शिक्षण पूर्ण झाले असून, ती आता तिच्या घरी म्हणजेच मुंबईत परतत आहे. खुद्द सुहानाने ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. सुहानाने एक फोटो पोस्ट केला आहे, ज्या फोटो मध्ये "Don't worr. Even if you leave New York, you will always be a New Yorke" असं लिहिलं आहे.

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान 21 वर्षांची आहे. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. सुहानाने नोव्हेंबर 2019 मध्ये 'द ग्रे पार्ट ऑफ ब्लू'मध्ये काम देखील केलेलं होते. इंग्रजीमध्ये बनवलेल्या या 10 मिनिटांच्या लघुपटातील सुहानाच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आणि तिच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल उत्सुकता वाढली. मात्र, चित्रपटात येण्यापूर्वी सुहाना तिचे शिक्षण पूर्ण करेल, असे शाहरुखने सांगितले होते. सुहाना सध्या न्यूयॉर्कमध्ये फिल्म मेकिंगचा कोर्स करत होती. 'झिरो' चित्रपटात त्याने वडील शाहरुख खान यांना असिस्ट केले होते.

क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यनला जामीन मिळाल्यापासून सुहानाच्या परतण्याबाबत बातम्या येत होत्या की ती दिवाळी आणि आर्यनचा वाढदिवस कुटुंबासोबत साजरी करणार आहे. मात्र ती भारतात परत येऊ शकली नाही. आता सुहानाच्या एका पोस्टने याची पुष्टी केली आहे. आता तीचे शिक्षण पूर्ण झाले असून, ती आता तिच्या घरी म्हणजेच मुंबईत परतत आहे.

Updated : 25 Nov 2021 9:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top