Home > Entertainment > सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांचा नवा चित्रपट लवकरच ...

सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांचा नवा चित्रपट लवकरच ...

सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांचा नवा चित्रपट लवकरच ...
X


सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान आता एकत्र दिसणार आहेत. सुबोध भावे यांचे गेल्या काही वर्षात अनेक चित्रपट आले आणि या सर्व चित्रपटांमध्ये त्यांची भूमिका नेहमी कौतुकास्पद ठरली. "ती सध्या काय करते" या चित्रपटांमधून त्याचबरोबर "होणार सून मी या घरची" या तेजश्री प्रधानच्या मालिकेमुळे तीही चाहत्यांना खूप प्रिय आहे.

अशा या कमाल कलाकारांची धमाल आता एकत्र पाहता येणार आहे. सुबोध भावे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर "'हॅशटॅग तदेव लग्नम" या चित्रपटात तेजश्री प्रधानसोबत सुबोध भावे एकत्र दिसणार असल्याची माहिती दिली आहे.

सुबोध भावेचा "फुलराणी" हा चित्रपट सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडला. यामध्ये हास्य जत्रेतील प्रियदर्शनी ही कलाकार मुख्य नायिकेच्या भूमिकेत होती . सुबोध भावे यांनी फुलराणी हा चित्रपट आता फक्त मराठीत नाही तर हिंदीमध्ये सुद्धा उपलब्ध असल्याचं सांगितलं आहे . त्यामुळे जर तुम्हाला फुलराणी पुन्हा एकदा हिंदीमध्ये पाहायचा असेल तर नक्की तुम्ही पाहू शकता .

'हॅशटॅग तदेव लग्नम' कौटुंबिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे .चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या चित्रपटात तेजस्वी प्रधान आणि सुबोध भावे हे प्रमुख भूमिकेत असणार आहेत . तुम्हाला या दोघांची जोडी एकत्र पाहायला आवडेल का ? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

Updated : 2 Jun 2023 8:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top