Home > Entertainment > सलमान खानवर लैंगिक छळाचे आरोप करणारी सोमी कोण आहे ?

सलमान खानवर लैंगिक छळाचे आरोप करणारी सोमी कोण आहे ?

सलमान खानवर लैंगिक छळाचे आरोप करणारी सोमी कोण आहे ?
X

"मी मुंबईत असताना सलमान खान मला शिवीगाळ आणि मारहाण करायचा. त्यावेळी माझे मेकअप आर्टिस्ट अजय शेलार यांना जखम लपविण्यासाठी माझ्या मानेवर आणि इतर अनेक ठिकाणी मेकअप करावा लागला होता. मी जेव्हा स्टुडिओत जायचे तेव्हा निर्माते हे सगळे बघायचे. हे मी सर्व स्टंटसाठी नाही सांगत आहे. सलमाने हे अनेक मुलींसोबत केले आहे."अशी पोस्ट सोमी आली ने केली आहे .

सलमान खानवर त्याची x एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने केलेले गंभीर आरोप आहेत. सलमान खान मला शिवीगाळ आणि मारहाण करायचा असा हा गंभीर आरोप आहे इतकंच काय सलमानने असं अनेक मुलींशी केलं असल्याचं तिने थेट समाजमाध्यमांवर सांगितले आहे.सोमी आणि सलमानचे हे प्रकरण नक्की काय आहे? तिने पहिल्यांदाच असे आरोप केले आहेत का? याविषयी माहिती देणारा हा व्हिडीओ नक्की पहा ...

सलमान खान म्हंटल की त्याची एक वेगेळीच छबी त्याच्या चाहत्यांवर आहे. भन्नाट फॅन फॉलोअर्स असलेला सलमान त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त अनेकदा चर्चेत असतो.. आता पुन्हा एकदा या दबंग स्ट्रारची चर्चा सुरु आहे ती त्याच्या X गर्लफ्रेंडने केलेल्या आरोपामुळे.. तर झालं असं आहे की सोमी अलीची एक पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. सोमी अलीने यापूर्वी देखील सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी तिने सलमानने तिचा छळ केल्याचे म्हटले आहे. तिने समाजमाध्यमांवर जी पोस्ट केली आहे त्यात तिने तिच्यावर लहान पानापासून झालेल्या अत्याचाविषयी देखील खुलासा केला आहे..

सॅमीने मोअर टियर्स नावाची एक संस्था सुरु केली आहे. सोमी म्हणते मी स्वतः लहानपणी लैंगिक हिंसाचाराला बळी पडली होती. वयाच्या पाचव्या वर्षी आपले शारीरिक शोषण झाल्याचे तिने सांगितले. वयाच्या १४ व्या वर्षी अमेरिकेत तिच्यावर अत्याचार झाला. इतकाच काय ती ज्याला ती आठ वर्षे डेट करत होती त्याच व्यक्तीने तिच्यावर घरगुती हिंसाचारही केला असं ती या पोस्टमध्ये म्हणते..

Updated : 7 Jan 2023 10:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top