Home > Entertainment > Sidharth Kiara Wedding: सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लग्नबंधनात अडकले

Sidharth Kiara Wedding: सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लग्नबंधनात अडकले

sidharth malhotra and kiara adwani get married

Sidharth Kiara Wedding: सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लग्नबंधनात अडकले
X


बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी आज अखेर लग्नगाठ बांधली. निवडक नातेवाईकांच्या सहवासात एकमेकांना साक्षी मानून या जोडप्याने फेरे घेतले. ७ फेब्रुवारी हा दिवस कियारा आणि सिद्धार्थ च्या आयुष्यातला अतिशय सुंदर दिवस ठरला आहे.

सिद्धार्थ मल्होत्राने (Sidharth Malhotra) ग्रँड एन्ट्री केल्यावर "साजन जी घर आये" या गाण्याने त्याचे स्वागत करण्यात आले. त्याच बरोबर बार बार देखो या चित्रपटातील "काला चश्मा" हे सुपरहिट गाणं वाजवण्यात आलं. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांचे लग्न राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये पार पडले. 'शेरशाह' (shershaah) सहकलाकारही लग्नसोहळ्याला रविवारी सुरुवात झाली.

सोमवारी, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी त्यांच्या प्रियजनांसाठी संगीत रात्रीचे आयोजन केले होते. संगीत रजनीसाठी भव्य रोषणाई करण्यात आली होती. संगीत रजनीत अभिनेत्रीच्या कुटुंबाकडून नववधूसाठी विशेष परफॉर्मन्स केला, त्यांनी "गोरी नल" ते "रंगीसारी" पर्यंत विविध प्रकारच्या गाण्यांवर नृत्य केले. या उत्सवात "रांझा," "मन भराया," "कभी तुम्हे," "तेरा बन जाऊंगा," "से ना," "मेहंदी लगाके रखना," "साजन जी," आणि "पटियाला पेग" या गाण्यांचा समावेश होता.

जुही चावला आणि तिचा जोडीदार जैसलमेरला या लग्नासाठी आले होते. तिने नवविवाहित जोडप्याचे अभिनंदन केले आणि त्यांचे वर्णन "लव्हली कपल" असे केले. जुही चावलाने तिच्या इंस्टाग्राम पोस्टवर सिद्ध आणि कियारा यांच्या लग्नासाठी जात आहे. शाहिद कपूर आणि पत्नी मीरा, करण जोहर, जुही चावला आणि मनीष मल्होत्रा यांच्यासारख्या मित्रांच्या उपस्थितीत, कियारा आणि सिद्धार्थचं जैसलमेरच्या सूर्यगड हॉटेलमध्ये लग्न पार पडलं. त्याच ठिकाणी सिद्धार्थ आणि कियारा यांच्यासाठी हळदी, मेहंदी आणि संगीत समारंभ पार पडला.

सेलिब्रेशन सुरू करण्यासाठी सिद्धार्थ आणि कियारा शनिवारी लग्नाच्या ठिकाणी पोहोचले. बॉलीवूड स्टार सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नात पाहुण्यांना 10 देशांतील 100 हून अधिक अन्नपदार्थ ठेवण्यात आले होते. मेन्यूमध्ये इटालियन, चायनीज, अमेरिकन, दक्षिण भारतीय, मेक्सिकन, राजस्थानी, पंजाबी आणि गुजराती पाककृतींचा समावेश होता.

Updated : 7 Feb 2023 3:26 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top