Home > Entertainment > शिल्पा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली आणि इकडे चोरांनी घरावर डल्ला मारला...

शिल्पा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली आणि इकडे चोरांनी घरावर डल्ला मारला...

शिल्पा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली आणि इकडे चोरांनी घरावर डल्ला मारला...
X

गेल्या आठवड्यात शिल्पा शेट्टीच्या जुहूच्या बंगल्यात चोरी झाली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलीस या दोघांची चौकशी करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीच्या घरातून मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालाची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही...

शिल्पा शेट्टीच्या घरातील चोरीप्रकरणी पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. मात्र, घरातून चोरीला गेलेल्या वस्तू व वस्तूंची किंमत किती आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

शिल्पा लंडन, इटलीमध्ये सुट्टी घालवत आहे...

अलीकडेच शिल्पाने सोशल मीडियावर इटलीतील टस्कनी येथील फोटो शेअर केले आहेत. शिल्पा शेट्टीने 8 जून रोजी तिचा 48 वा वाढदिवस साजरा केला. शिल्पा आपल्या कुटुंबासोबत सुट्टीसाठी लंडनला गेली होती. अलीकडेच, शिल्पाने तिच्या हंगामा 2 या चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर पुनरागमन केले. यानंतर शिल्पा 'निकम्मा' या चित्रपटात अभिमन्यू दासानी आणि शर्ली सेटियासोबत दिसली होती. शिल्पा शेट्टी लवकरच रोहित शेट्टीच्या इंडियन पोलिस फोर्स या वेब सीरिजमधून ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे...

Updated : 16 Jun 2023 5:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top