Home > Entertainment > शेफाली शाह ते नोरा फतेही यांच रेड फ्लॅग बद्दलचं मत

शेफाली शाह ते नोरा फतेही यांच रेड फ्लॅग बद्दलचं मत

शेफाली शाह, अनन्या पांडे, कतरिना कैफ आणि ,नोरा फतेह य़ांनी रेड फ्लॅग शेअर केले आहेत.

शेफाली शाह ते नोरा फतेही यांच रेड फ्लॅग बद्दलचं मत
X

red flag हा शब्द घोक्याची घंटा वाजवून, धोक्याचे संकेत दर्शवितो. रेड फ्लॅग म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला relationship मध्ये असणाऱ्या किंवा breakup होऊन अलिप्त झालेल्या व्यक्तीला विचारावे लागेल.शेफाली शाह, अनन्या पांडे, कतरिना कैफ आणि ,नोरा फतेह य़ांनी रेड फ्लॅग शेअर केले आहेत.

प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली शाह Shefali shah हीने एका मुलाखती दरम्यान तिला वाटणारा रेड फ्लॅग शेअर केला होता. तिच्या मते नात्यात जर आदर मिळत नसेल किंवा पार्टनर जर सतत तुमचही लाज आणि अक्कल काढत असेल तर तो एक रेड फ्लॅगच समजला गेला पाहिजे. शेफाली शाह म्हणते की, “सुरुवातीला मस्करी अगदी लाईट नोट वर असते. पण आपण ऐकून घेतो म्हणून हळूहळू लेव्हल वाढत जाते आणि ती इतकी वाढते की आपलं मन दुखावू लागतं. आपल्याला वाईट वाटतंय हे पाहून पण समोरचा शांत होत नसेल तर तो रेड फ्लॅगच आहे.”

सध्या अभिनेता आदित्य रॉय कपूर Aditya Roy Kapoor सोबत डेट करत असल्याची चर्चा असणारी अनन्या पांडेने Ananya Pande सुद्धा रेड फ्लॅग्स बाबत आपले मत व्य़क्त केले आहे. यावेळी तिने सांगितले की इतरांसोबत प्रेम न दाखवणे, किंवा पार्टनरचा आदर न करणे हा नात्यातला रेड फ्लॅग आहे. जर तो व्यक्ती सार्वजनिकरीत्या तुमच्या पासून लाब राहत असेल तर असे नाते काही कामाचे नाही.

खरंतर कतरिना कैफने Katrina Kaif स्वत:हून कधी नात्यातल्या रेड फ्लॅग्स बद्दल भाष्य केलेले नाही. पण तिचा पती विकी कौशलने Vicky Kaushyal एकदा बोलता बोलता तिच्या दृष्टीने रेड फ्लॅग्स काय असू शकतो याची हिंट दिली होती. तो म्हणाला की, “कतरिनाला हट्टी स्वभाव आवडत नाही. मी नात्याच्या सुरुवातीला जेव्हा एखादा हट्ट करायचो क्किंवा एखादी गोष्ट सोडून द्यायला वेळ घ्यायचो तेव्हा ती चिडायची. तिला असे वागणे आवडायचे नाही.” तर आपण असे म्हणू शकतो नात्यात हट्टी असणे हा कतरिनाच्या दृष्टीने रेड फ्लॅग आहे.

बॉलीवूड Bollywood स्टार नोरा फतेहीच्या Nora fatehi मते जर एखादा व्यक्ती अचानक गायब होत असेल आणि मध्ये मध्ये तुमच्या लाईफ मध्ये येत असेल तर त्या व्यक्तीला सिरीयसली घेऊ नका. तो एक रेड फ्लॅग आहे. ती म्हणाली की, “काही जण असे असतात जे एक दिवस तुमच्याशी खूप गोड बोलतात, तुम्हाला त्यांच्याबाबत विचार करायला भाग पाडतात आणि नंतर काही दिवस चक्क गायब होतात. कोणताच रिस्पोन्स देत नाहीत. असे वागणे म्हणजे रेड फ्लॅग आहे.” तर तुम्हाला आलेले रेड फ्लॅग चे अनुभव काय आहेत? हे कॉमेंट करून नक्की कळवा.

Updated : 13 Feb 2024 12:07 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top