Home > Entertainment > शनाया सोडणार 'माझ्या नवऱ्याची बायको'

शनाया सोडणार 'माझ्या नवऱ्याची बायको'

शनाया सोडणार माझ्या नवऱ्याची बायको
X

छोट्या पडद्यावरील झी मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे 'माझ्या नवऱ्याची बायको'. ही मालिका सध्या सुपरहिट असून मालिकेत शनाया हे पात्र सतत चर्चेत असतात. या मालिकेचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. मात्र आता या मालिकेतून शनाया एक्झिट घेणार असल्याची चर्चा सुरु आहेत. 'माझ्या नवऱ्याची बायको' मधलं अभिनेत्री रसिका सुनील साकारत असलेलं मात्र मालिका सुरू झाल्यापासून कायम चर्चेत आहे.

शनाया ही मालिकेत सध्या रेडिओ जॉकी बनली आहे. पण शनायाचा आधीचा बॉयफ्रेंड आर. जे बिंदूराणीला फोन करतो आणि शनाया आणि तिच्या आधीच्या बॉयफ्रेंडची पुन्हा भेट होते. या भेटीनंतर शनाया परदेशात निघून जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे शनाया म्हणजेच रसिका सुनील लवकरच मालिकेतून एक्झिट घेणार असल्याचे म्हटले जात आहे.

मालिकेच्या सुरुवातीला अभिनेत्री रसिका सुनीलने शनाया हे पात्र साकारले होते. तिची गुरूसोबत असलेली कॅमेस्ट्री विशेष गाजली होती. त्यांनतर शनायची भूमिका अभिनेत्री इशा केसकरने साकरली. पण काही कारणास्तव इशाने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आणि मालिकेत पुन्हा रसिकाची एण्ट्री झाली होती. आता मालिकेतील शनाया हे पात्रच वगळलं जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Updated : 9 Jan 2021 7:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top