Home > Entertainment > घाबरला शाहरुख खान

घाबरला शाहरुख खान

घाबरला शाहरुख खान
X

हिरो कुणाला घाबरत नाही. खास करून DON, डर सारख्या चित्रपटात घाबरवणारी भूमिका करणारा शाहरुख खान म्हणजे SRK कुणाला घाबरत असेल असं तुम्हाला सांगितलं तर खरं वाटेल का? पण हो, शाहरूख ही घाबरतो. खासकरून गौरी खान ला.. गौरी खान सोबतचा शाहरूख खानचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये घाबरलेला शाहरूख खान दिसतोय. शाहरूख च्या या व्हिडिओवरून सोशल मिडीया वर ही बरीच चर्चा सुरू आहे.

शाहरुख खानच्या पठाण चित्रपटानंतर आता जवान हा चित्रपट येत आहे. या दरम्यान एक विडिओ मात्र जोरदार चर्चेत येत आहे . शाहरुख हा तर बॉलिवूडचा बादशहा समजला जातो.त्याचा पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडला आहे . पठाण चित्रपटाची चर्चाच इतकी झाली कि हा चित्रपट पाहण्यासाठी परदेशातून त्याचे चाहते भारतात आले होते. बॉक्स ऑफिसवर पठाण चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसचे आतापर्यंतचे सारे रेकॉर्ड पठाण चित्रपटाने तोडले आहेत. सध्या शाहरुख त्याच्या येणाऱ्या चित्रपटाबद्दल चर्चेत आला आहे. जवान असं या चित्रपटाचे नाव आहे.याच दिवसात गौरी खान आणि शाहरुखचा जुना विडिओ व्हायरल होत आहे . या व्हिडिओमध्ये गौरी खान अतिशय वेगाने दुचाकी चालवत आहे. आणि तिच्या मागे शाहरुख खान घाबरलेल्या अवस्थेत बसलेला दिसत आहे.खरंतर या दोघांचे अनेक प्रेमाचे किस्से आजवर सर्वानी ऐकले आहेत . पण या व्हिडिओमध्ये गौरी खान जसा दुचाकीचा वेग वाढवते तसं शाहरुख खूप घाबरताना दिसत आहे. याचवेळी शाहरुखची मुलगी सुहाना मात्र स्वतः गाडीवर बसण्यासाठी हट्ट करताना दिसत आहे.

नक्की हा व्हिडिओमध्ये आहे तरी काय ?

गौरी खान हि समुद्राच्या शेजारी वेगाने बाईक चालवत आहे. पण व्हिडिओच्या सुरुवातीलाच शाहरुख तिला म्हणतो कि ,मला भीती वाटत आहे ,गौरी आपण थोडं हळू जाऊयात . मी स्टंट करू शकतो पण जास्त वेग मला सहन नाही होत "यानंतर गौरी शाहरुखला आपल्या मागे बसण्यास सांगते . आता शाहरुख अगदी जीव मुठीत घेऊन बसतो . पण जशी गौरी खान बाईक चालवायला सुरुवात करते . तसं शाहरुख खूप घाबरतो . हे पाहून सुहाना सुद्धा गाडीवर बसण्याचा हट्ट करते. पण शाहरुखची अशी अवस्था पाहून गौरी शाहरुखला तू इतका का घाबरतो आहेस? असं विचारते. तेंव्हा शाहरुख अगदीच घाबरलेला असल्याने, "तू तुझ्या आईसोबत जा "असं उत्तर देतो . त्याचबरोबर गौरीला वेग कमी करण्याची विनंती सुद्धा करतो .

शाहरुख आणि गौरीची जोडी का आहे प्रसिद्ध ?

अश्या अनेक घटना आपण शाहरुख आणि गौरीबद्दल ऐकत असतो . अनेकदा शाहरुखचे चाहते हे वेडे झाल्यासारखे त्याच्यावर जीव ओवाळून टाकतात. पण या दोघांची हि लव्ह केमेस्ट्री खूपच क्युट असल्याचे पाहायला मिळते . सोबतच लहानपणापासून आपल्या आईवडिलांच्या आयुष्यात नवा आनंद देणारी सुहाना सुद्धा क्युट दिसत आहे. एकीकडे गौरीला वेगात बाईक चालवणं आवडतं तर दुसरीकडे बॉलिवूडचा बादशहा समजला जाणारा शाहरुख मात्र घाबरून बसला आहे . त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासातील याच गोष्टी चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत . आणि त्यामुळेच शाहरुख आणि गौरीची जोडी लोकं इतकी पसंत करतात .

Updated : 4 July 2023 4:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top