Home > Entertainment > बाबो.., शाहरुख खानने पत्नीचे वय चुकीचे सांगितले आणि मग काय ..

बाबो.., शाहरुख खानने पत्नीचे वय चुकीचे सांगितले आणि मग काय ..

बाबो.., शाहरुख खानने पत्नीचे वय चुकीचे सांगितले आणि मग काय ..
X

शाहरुख खानची पत्नी गौरी खानने सोमवारी तिचे पहिले कॉफी टेबल बुक लाँच केले. 'माय लाईफ इन डिझाईन' असे या पुस्तकाचे नाव आहे. सोशल मीडियावर या कार्यक्रमाशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये शाहरुख मीडियाशी संवाद साधताना गौरीचे वय चुकीचे सांगत आहे. आता बायकोचे वय चुकीचे सांगितल्यावर तेही ती समोर असताना काय होणार हे आम्ही सांगायला नको.. आता शाहरुख सोबत या वेळी काय झालं हे पाहण्यासाठी व्हिडिओ माहिती वाचा..

शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान बॉलिवूडच्या लोकप्रिय जोड्यांपैकी एक मानले जातात. गौरी आणि शाहरुख विविध कारणांनी कायमच चर्चेत असतात. गौरी खानने बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतंच शाहरुख खानने पत्नी गौरी खानच्या कॉफी टेबल बुक ‘माय लाइफ इन अ डिझाइन’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात हजेरी लावली. या वेळी शाहरुख आणि गौरी दोघांनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. याच वेळी शाहरुख कडून एक छोटी चूक झाली आणि मग काय कार्यक्रमस्थळी नुसता हशा पिकाला.. शाहरुखने चक्क आपल्या बायकोचेच वय चुकीचे सांगितले.

नक्की काय घडलं?

गौरी खान यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपला आणि त्यानंतर पत्रकारांसोबत दोघांनी गप्पा मारायला सुरुवात केली. यावेळी शाहरुख खान पत्नी गौरी खानचे भरभरून कौतुक करत होता आणि हेच कौतुक करत असताना त्याने नवी सुरुवात करायला कुठल्याही वयाची मर्यादा नसते असे सांगताना 'तिनं तिच्या चाळीशीत नवी सुरुवात केली,' असं म्हटलं. हे वाक्य म्हटल्यावर तो थोदा थांबला. कारण त्याला झालेली चूक लक्षात आली. कारण त्यानं गौरीचं वय चुकवलं होतं. हे सर्वांच्या लक्षात आल्यानंतर सर्वांनाच हसू अनावर झालं. त्यानं गौरीकडे बघताच ती देखील हसू लागली आणि तिनं शाहरुखला ३७ वर्षांची असल्याचं सांगितलं.Updated : 17 May 2023 5:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top