Home > Entertainment > #Pathaan : पठाण चित्रपटाचे अडकलेले चित्रीकरण आता स्पेनमध्ये सुरू होणार..

#Pathaan : पठाण चित्रपटाचे अडकलेले चित्रीकरण आता स्पेनमध्ये सुरू होणार..

#Pathaan : पठाण चित्रपटाचे अडकलेले चित्रीकरण आता स्पेनमध्ये सुरू होणार..
X

मागील काही दिवसांपासून अनेक कारणांमुळे यश राज फिल्म प्रस्तुत पठाण चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटात शाहरुख खान (Shah Rukh Khan), जॉन इब्राहिम (John Abraham) व दीपिका पदुकोण (Deepika Padukone) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण आता पुन्हा सुरू होणार होते इतक्या सध्या सुरू असलेल्या रशिया युक्रेन ( Russian Ukrainian War) युद्धामुळे काय होणार असे सर्वांना वाटतं होते मात्र चित्रपटाचे उर्वरित चित्रीकरण लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

रशिया-युक्रेन युद्धानंतरही भारतीय चित्रपटांच्या रशियातील चित्रीकरणावर परिणाम होईल असं म्हंटल जात होतं मात्र चित्रपटांच्या चित्रीकरणावर तसा कोणताही परिणाम झालेला नाही आहे. तसेच युरोपीय देशांतील चित्रीकरणावरही कोणताही परिणाम झालेला नाही. पीटर्सबर्ग आणि मॉस्को येथे अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ, क्रिती सेनॉन आणि भूमी पेडणेकर यांच्या आगामी चित्रपटांचे शूटिंग होऊ शकते. त्याचवेळी 'पठाण' (Pathan) चित्रपटाचे शेवटचे शेड्यूल स्पेन, युरोपमध्ये सुरू होत आहे. चित्रपटाशी संबंधित दोन वेगवेगळ्या तारखा सांगण्यात आल्या आहेत. जेव्हा चित्रपटाचे तीन मुख्य लीड मुंबईहून स्पेनला रवाना होतील. त्यावेळी वीकेंडला शाहरुख, दीपिका आणि जॉन जाण्याची दाट शक्यता आहे. तसे न झाल्यास 8 किंवा 9 मार्च रोजी ते मुंबईहून स्पेनला जातील.

ओमिक्रॉनमुळे (Omicron) स्पेन वेळापत्रकानुसार होता

इतर माध्यमात छापून आलेल्या माहितीनुसार, 'पठाण' चे स्पेन मधील शेड्यूल गेल्या वर्षी 10 ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे. पण तेव्हापासून ते कोव्हीड आणि आर्यन खान प्रकरणामुळे पुढे सरकत आहे. या वर्षीही फेब्रुवारीमध्ये शूट चालू होणार होते, परंतु नंतर कोविडच्या ओमिक्रॉन प्रकारामुळे परिस्थिती पुन्हा बिगडली. मात्र, आता स्पेनमध्ये शूट करण्यासाठी अंतिम तयारी करण्यात आली आहे. "गेल्या ऑक्टोबरमध्ये 21 दिवसांसाठी शाहरुख आणि दीपिका या चित्रपटातील गाणे स्पेनच्या मॅलोर्का, कॅडिझ आणि वेजेर डेला फ्रंटेरा या शहरांमध्ये शूट करणार होते. आता कोणत्या शहरांमध्ये शूटिंग होणार याची माहिती अद्याप समोर कुठेही समोर आलेली नाही.

Updated : 2 March 2022 7:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top