Home > Entertainment > Satyaprem ki katha प्रेमात येणार आता ट्विस्ट

Satyaprem ki katha प्रेमात येणार आता ट्विस्ट

Satyaprem ki katha प्रेमात येणार आता ट्विस्ट
X

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवणी या दोघांचा सत्य प्रेम की कथा नावाचा नवा चित्रपट येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला असून त्याला काही तासातच चांगला प्रतिसाद मिळत आहे

कियारा अडवाणी यामध्ये मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे . त्याचबरोबर या चित्रपटात विनोदाचा तडका सुद्धा बघायला मिळणार आहे. राजपाल यादव ची सुद्धा यामध्ये धमाल कॉमेडी दिसत आहे.

कबीर सिंग या चित्रपटानंतर कियारा अडवाणी ही नेहमीच चर्चेत आलेली आपल्याला दिसते . यानंतर अनेक चांगले चित्रपट कियाराने केले आहेत. त्याचबरोबर कार्तिक आर्यन हा सुद्धा युवकांच्या गळ्यातील ताईत आहे . अनेक तरुण कार्तिक आर्यन सारखी स्टाईल करण्यासाठी वेगवेगळे लूक करत असतात.

या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि कियाराची लव स्टोरी दाखवली आहे आणि कार्तिकचं नाव सत्य प्रेम असल्यामुळे आणि कियारा म्हणजे कथा त्यामुळे चित्रपटाचं नाव सत्य प्रेम कि कथा असं देण्यात आले आहे . तुम्हाला हा चित्रपट बघायला आवडेल का ? यांची ही नवीन लव स्टोरी पाहायला आवडेल का? हे आम्हाला प्रतिसादात कळवा.

Updated : 7 Jun 2023 3:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top