Home > Entertainment > Satish Koushik मुलाच्या निधनानंतर तब्बल 16 वर्षाने त्यांना एक मुलगी झाली आणि आयुष्य बदललं...

Satish Koushik मुलाच्या निधनानंतर तब्बल 16 वर्षाने त्यांना एक मुलगी झाली आणि आयुष्य बदललं...

Satish Koushik मुलाच्या निधनानंतर तब्बल 16 वर्षाने त्यांना एक मुलगी झाली आणि आयुष्य बदललं...
X

लोकप्रिय बॉलीवूड निर्माता-दिग्दर्शक आणि अभिनेता सतीश कौशिक (Satish Kaushik)यांचा जन्म 13 एप्रिल 1956 रोजी झाला. त्यांचा जन्म हरियाणाच्या महेंद्रगड जिल्ह्यात झाला. त्यांनी बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. आपल्या विनोदी अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले. 1983 मध्ये त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात ही सहाय्यक दिग्दर्शकाच्या रुपात केली. 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या "मासूम" या चित्रपटासोबत त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. सतीश कौशिक यांनी 'जाने भी दो यारों' या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. याशिवाय या चित्रपटाचे संवादही त्यांनी लिहिले आहेत. 1993 रोजी फिल्ममेकर म्हणून त्यांचा पहिला चित्रपट 'रूप की रानी चोरों का राजा' हा होता, ज्यामध्ये 'श्रीदेवी' मुख्य भूमिकेत होती. 'सतीश कौशिक' यांचा 'तेरे संग' हा त्यांचा पहिला दिग्दर्शित केलेला चित्रपट होता.

1990 मध्ये "राम लखन" आणि 1997 मध्ये "साजन चले ससुराल" या चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. मोठ्या पडद्यावर आपल्या भूमिकांनी चाहत्यांना खळखळून हसवणारे सतीश कौशिक यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात एका घटनेला सामोरे जावे लागले ज्यामुळे त्यांचा अक्षरश तुटुन पडले. 1990 मध्ये त्यांनी त्यांचा दोन वर्षांचा मुलगा सोनू याला गमावला. वडिलांसाठी हा मोठा धक्का होता. परंतु या घटनेतून बाहेर पडण्यासाठी सतीश कौशिक स्वत:ला कामात व्यस्त ठेवायचे. मुलाच्या निधनानंतर तब्बत 16 वर्षाने त्यांना एक मुलगी झाली. मुलगी झाल्यावर त्यांच संपुर्ण आयुष्य बदलुन गेल.

त्यांनी आतापर्यंत सुमारे 100 चित्रपटांमध्ये योगदान दिले आहे. सतीश कौशिक यांनी ‘हम आपके दिल में रहते हैं’,‘हमारा दिल आपके पास है’,‘मुझे कुछ कहना है’,‘बधाई हो बधाई’,‘तेरे नाम’, ‘क्योंकि’,‘ढोल’ आणि ‘कागज’सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले आहे. असे अनेक चित्रपटांनी चाहत्यांच्या मनावर छाप सोडले आहे. आयुष्यात आल्यावर प्रत्येक व्यक्तीला एक दिवशी अखेरचा निरोप हा घ्यावाच लागतो अनेक चित्रपटांनी चाहत्यांच्या मनावर छाप सोडलेला अभिनेता सतीश कौशिक हा वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. कोणत्याही व्यक्तीला जिवंतपणी जेवढी किंमत केली जात नाही तेवढी किंमत तो व्यक्ती गेल्यावर केली जाते. सतीश कौशिक याचे इंन्ट्राग्रामवर जेवढे आत्तापर्यंत फॅालेवर्स होते त्या व्यक्तीच्या गेल्यावर दुप्पट झाली आहे ,आपल्या समाजात अनेक व्यक्ती आहेत पण बऱ्याचदा व्यक्ती जेंव्हा या जगाचा निरोप घेतो तेंव्हा त्याच्याविषयी जास्त बोललं जात,हे वास्तव आपण नाकारू शकत नाही ...

Updated : 11 March 2023 1:21 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top