Home > Entertainment > हसायचं नसेल तर हा व्हिडिओ पाहू नका..

हसायचं नसेल तर हा व्हिडिओ पाहू नका..

हसायचं नसेल तर हा व्हिडिओ पाहू नका..
X

सारा अली खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या दर्शकांना गॅसलाइट कशी करावी हे सांगत आहे. पहिल्या पद्धतीत सारा अली खानने काही फुगे घेतले आहेत जे गॅसने भरलेले आहेत. हे फुगे सोडताना सारा म्हणते की त्यात गॅस होता आणि आता ते हलके होत आहेत. नक्की हे गॅसलाइट काय आहेत? सारा नक्की या व्हिडिओ मध्ये काय करतीये पहा..

सारा अली खान तिच्या लुक व हटके अंदाजामुळे कायम चर्चेत असलेलं नाव. सारा नेहमीच समाजमाध्यमांवर ऍक्टिव्ह असते तिचे असे अनेक मजेदार व्हिडिओ तिच्या अकॉउंटवर आपल्याला पाहायला मिळतात. आता सुद्धा साराने एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे, या व्हिडिओ मध्ये ती गॅसलाइट लोक कसे असतात हे सांगत आहे. पहिला काय केलं आहे साराने तर तिने काही फुगे घेतले आहेत जे गॅसने भरलेले आहेत. हे फुगे सोडताना सारा म्हणते की त्यात गॅस होता आणि आता ते हलके होत आहेत त्यानंतर ट्रकच्या डिझेल टाकीत गॅस भरला आणि नंतर त्यावर टॉर्चपडला कि होतो गॅसलीघाट.. आणि शेवटचा तिसरा प्रकार म्हणजे जर एखादी स्त्री तुमच्या समोर उभी राहून समोरून येणारा प्रकाश थांबवते आणि सोबत गॅस सोडते, तर तो गॅसलाइट असेल असं ती म्हणते आहे...

सारा अली खानचा चित्रपट 'गॅसलाइट' या महिन्यात 31 मार्च रोजी OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर प्रदर्शित होणार आहे. पवन कृपलानी दिग्दर्शित हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. 'गॅसलाइट'मध्ये विक्रांत मॅसी आणि चित्रांगदा सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. म्हणून प्रमोशनसाठी तिने हा मजेशीर व्हिडिओ शेअर केला आले..

Updated : 1 April 2023 4:20 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top