Home > Entertainment > कसं बस सलमानच्या Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan चित्रपटाने १०० कोटी पार केले...

कसं बस सलमानच्या Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan चित्रपटाने १०० कोटी पार केले...

कसं बस सलमानच्या Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan चित्रपटाने १०० कोटी पार केले...
X

ईदला रिलीज झालेला सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाने 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. दुसऱ्या रविवारी या चित्रपटाने 4.35 कोटींची कमाई केली. आता चित्रपटाचे एकूण कलेक्शन 100.28 करोड इतके झाले आहे. मात्र, सलमानच्या आधीच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, किसी का भाई किसी की जानला १०० कोटींची कमाई करायला बराच वेळ लागला.

सलमान खानच्या गेल्या काही चित्रपटांचे रेकॉर्ड बघितले तर या सगळ्यांनी पहिल्या आठवड्यात १०० कोटींहून अधिक कमाई केली होती. 2023 मध्ये आतापर्यंत फक्त तीन हिंदी चित्रपट आहेत ज्यांनी 100 कोटी किंवा त्याहून अधिक कमाई केली आहे.

10 व्या दिवशी 100 कोटी क्लबमध्ये एंट्री...

भारत या सलमानच्या आधीच्या चित्रपटाने पहिल्या आठवड्याच्या अखेरीसच सुमारे 180 कोटींची कमाई केली होती. याशिवाय दबंग 3 ने रिलीजच्या पहिल्या सात दिवसांत 121 कोटींहून अधिक कमाई केली होती. रेस 3 ने पहिल्या आठवड्यात 140 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

टायगर जिंदा हैने पहिल्या आठवड्यात 206.04 कोटींची कमाई केली होती. ट्यूबलाइटसारख्या फ्लॉप चित्रपटानेही पहिल्या आठवड्यात 106 कोटींची कमाई केली होती. तसं पाहिलं तर, किसी का भाई किसी की जानचे आकडे सलमान आणि त्याच्या चाहत्यांना निराश करणारेच म्हणावे लागतील..

Updated : 2 May 2023 1:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top