Home > Entertainment > Salman Khan ने असं काही केलं चाहते बघतच राहिले...

Salman Khan ने असं काही केलं चाहते बघतच राहिले...

Salman Khan ने असं काही केलं चाहते बघतच राहिले...
X

भाईजान असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एकच व्यक्ती येते ती म्हणजे सलमान खान.. पिळदार शरीर, हातात ब्रेसलेट आणि त्याची ती चालण्याची हटके स्टाईलने अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातला आहे.. सलमान खान त्याच्या acting सोबत इतर अनेक गोष्टींमुळे वारंवार चर्चेत राहिला आहे किंवा अनेक वेळा अडचणीत आला आहे. त्याच्या या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करायला नको.., बाकी काही असले तरी सलमान खान नेहमीच काहीतरी हटके करत असतो.., आता असंच काही सलमान खाननं हटके केला आहे, तेही कॉमेडियन कपिल शर्मा यांच्या शोमध्ये.. कपिल शर्मा यांचा शो सुरू होता आणि त्या शोमध्ये ते गाणं गात होते, मग काय अचानक सलमान उठला आणि पुढे असं काही झालं त्याचाच तर व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. नक्की कपिल शर्माच्या स्टेजवर काय घडलं? हे पाहण्यासाठी हि माहिती निक्की वाचा..

सध्या सलमान खान त्याचा आगामी चित्रपट 'किसी का भाई किसी की जान'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, भाईजान त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी संपूर्ण टीमसोबत कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचला, जिथे त्याने कपिल शर्मा यांच्यासोबत गाणे गायले आणि डान्स केला. हाच व्हिडिओ कपिल शर्मा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.


व्हिडिओच्या सुरुवातीला कपिल शर्मा 'जीने के है चार दिन' गाणे सुरू करतात, त्यानंतर भाईजानही ​​माईक घेतो आणि गाणे सुरू करतो, गाणे ऐकत असताना शहनाज गिलसह चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट नाचताना दिसते. व्हिडिओ शेअर करताना कपिल शर्मा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'भाईजान मूडमध्ये आहे'.

ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे

सलमान खान आणि पूजा हेगडे यांचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट 21 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, ते पाहून चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात जस्सी गिल, राघव जुयाल आणि सिद्धार्थ निगम हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्याचबरोबर बिग बॉस 13 फेम शहनाज गिल आणि श्वेता तिवारी यांची मुलगी पलक तिवारी सलमान खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Updated : 15 April 2023 2:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top