Home > Entertainment > "किसी का भाई किसी की जान" ईदला सलमानचा येणार हा चित्रपट...

"किसी का भाई किसी की जान" ईदला सलमानचा येणार हा चित्रपट...

किसी का भाई किसी की जान ईदला सलमानचा येणार हा चित्रपट...
X

दरवर्षी सलमान खान ईदला आपला एक नवीन चित्रपट प्रदर्शित करतो. या वर्षी सुद्धा सलमान खानचा एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच शाहरुख खानचा "पठाण" हा सिनेमा जोरदार चर्चेत आहे. सोबतच सलमान खानचा नवीन येणारा हा चित्रपट यातील लूक आणि शाहरुख खानचा पठाण मधील लुक काहीसा सारखा दिसत आहे.

नेहमीच सलमान खान सोबत कोणती अभिनेत्री काम करणार याच्याकडे सुद्धा चाहत्यांचं लक्ष लागून असतं, 2023 च्या ईद ला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटामध्ये सलमान खान सोबत "पूजा हेगडे "ही अभिनेत्री दिसणार आहे .या चित्रपटात सलमान खानचे वेगवेगळे लूक दाखवण्यात आले आहेत .त्यामुळे सलमान खानच्या चित्रपटाची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे .या चित्रपटात बॉलीवूड टॉलीवूड असं एकत्र समीकरण आपल्याला पाहायला मिळते साउथ इंडियन सिनेमातील अभिनेता व्यंकटेश हा सुद्धा या चित्रपटात असणार असल्याचं आपल्याला ट्रेलर मधून कळत आहे.

"बस कर भाई"हा त्याचा डायलॉग सध्या चर्चेत आहे .किसी का भाई किसी की जान असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटात "लोग मुझे भाईजान नाम से पहचानते है" असा सलमान खानचा डायलॉग आपल्याला पाहायला मिळत आहे .त्यामुळे यावर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणारा हा चित्रपट सलमानला किती कमाई करून देईल याची सुद्धा प्रतीक्षा त्याच्या चाहत्यांना लागली आहे.

Updated : 3 Feb 2023 9:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top