Home > Entertainment > Bhaijaan लहानपणी घरात सर्वात जास्त खोडकर होता Salman

Bhaijaan लहानपणी घरात सर्वात जास्त खोडकर होता Salman

Bhaijaan लहानपणी घरात सर्वात जास्त खोडकर होता Salman
X


सलमान खान (Salaman khan )हा नेहमीच आपल्या स्टाईलने लोकांना वेड करतो. अनेक त्याचे चाहते त्याच्यावर भरपूर प्रेम करतात . सलमान खान (Salman khan ) त्याच्या चित्रपटात वेगवेगळ्या अंदाजात आपल्याला दिसतो. पण अनेक मुली या सलमान खानच्या स्टाईलवर फिदा आहेत. पण अनेकदा सलमान खान हा त्याच्या आणि अभिनेत्रींच्या वैयक्तिक आयुष्यावरून सुद्धा चर्चेत आलेला आपण पाहिला आहे .

सलमान खानला ( bhaijaan )लहानपणापासूनच अभिनयाची शिदोरी त्याच्या घरातून मिळाली आहे . सलमान खानचे वडील सलीम खान(salim khan ) यांनी स्वतः अनेक प्रसिद्ध चित्रपट लिहिले आहेत . जसं की शोले. "शोले" (sholay movie )चित्रपट हा भारतातील प्रत्येक व्यक्तीला माहित आहे. पण सलीम खान यांना अजूनही दोन मुले आहेत ज्यांचं नाव आहे, अरबाज खान (Arbaj khan )आणि सोहेल खान (sohail khan ) . हे तिन्ही भाऊ आपापल्या करिअरमध्ये एका उंचीवर पोहोचले असले, तरी सलमान खान मात्र नेहमीच प्रकाश झोतात असतो.

सलमान खान जितका वैयक्तिक आयुष्यात हसरा आणि खोडकर दिसतो ,चित्रपटात सुद्धा त्याच्या अशा अनेक भूमिका आहेत . पण खऱ्या आयुष्यात लहानपणी सलमान या भावंडांमध्ये सर्वात जास्त खोडकर होता ,असे सलमान खानचे वडील सलीम खान यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.

सलमान खान जितका रिअल लाईफ मध्ये खोडकर आहे. तितकाच तो चित्रपटांमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या अनेक भूमिका वटवताना आपल्याला दिसतो . तर सलमान खानची ( salman khan )ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ? ते प्रतिसादात नक्की कळवा .


Updated : 19 April 2023 11:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top