Home > Entertainment > सई ताम्हणकर उर्फीची कॉपी करतेय ?

सई ताम्हणकर उर्फीची कॉपी करतेय ?

सई ताम्हणकर उर्फीची कॉपी करतेय ?
X

सई ताम्हणकर च्या अनेक फोटोज वर वेगवेगळ्या मिम्स बनवल्या जातात. सई ताम्हणकरने एखादी पोज दिली की काही मिनिटातच हसवणाऱ्या अनेक मिम्स तयार होताना आपल्याला दिसतात आणि सोशल मीडियावर ,फेसबुक, इंस्टाग्राम ते व्हाट्सअप च्या स्टेटस पर्यंत सईचे असे मीम्स व्हायरल होतात . पण यावर सई कधीच संतापताना दिसत नाही

सई ताम्हणकर हे स्वतः आपल्या पेजवर सुद्धा शेअर करते आणि त्यामुळेच सई ताम्हणकरने दिलेली एखादी पोज किंवा सोशल मीडियावर पोस्ट केलेली एखादी पोज नेहमी व्हायरल होताना दिसते . पण सईने अवॉर्ड शोला घातलेला हा ब्ल्यू ड्रेस पोस्ट तर केला ,पण याला अनेकांच्या कमेंट अशा आल्या , सई तू उर्फी दिसत आहेस .

आता खरंच सई ताम्हणकर उर्फीची कॉपी करते का?

आता प्रत्येकाचे विचार याबाबतीत वेगवेगळ्या असू शकतात. पण निश्चितच याआधी उर्फी कोणालाच माहित नव्हतती . पण चित्रा वाघ आणि उर्फी हे प्रकरण झाल्यानंतर मात्र उर्फीवर अनेक जण स्पेशल लक्ष ठेवतात. तिचा व्हिडिओ किंवा फोटो किंवा नवीन स्टाईलचे कपडे आले रे आले की प्रचंड प्रमाणात व्हायरल सुद्धा होतात . पण आता अनेक अभिनेत्रींनी एखादी वेगळी स्टाईल केली तर ती उर्फीची स्टाईल आहे, असं सुद्धा लोकं म्हणायला लागले आहेत . उर्फी एक मॉडेल आहे ,उर्फीचा फॅशन मॅनर अनेक अभिनेत्री आवडीने पाहतात आणि लाईक सुद्धा करतात. मग कदाचित एखाद्या अभिनेत्रीला उर्फीचा ड्रेस आवडला तर तिने तशीच फॅशन करणे हे चुकीचं की बरोबर हे आपण ठरवू शकत नाही. हा वैयक्तिक त्या अभिनेत्रीचा प्रश्न आहे . याबद्दल तुम्हाला काय वाटतं ?हे आम्हाला नक्की कळवा ...

Updated : 1 April 2023 2:32 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top