Home > Entertainment > #RRR आता ऐकत नाही ... अजून एक अवॉर्ड

#RRR आता ऐकत नाही ... अजून एक अवॉर्ड

#RRR आता ऐकत नाही ... अजून एक अवॉर्ड
X

एसएस राजामौली' (s s rajamouli) यांनी दिग्दर्शित केलेला 'RRR' हा लोकांनमध्ये बहुचर्चीत चित्रपट ठरला तसेच या चित्रपटातील 'नाटू नाटू' हे गाण्याची सर्वत्र चांगलीच चर्चा चालु आहे. विश्व स्तरावर भारताची कला संस्कृती आणि सिनेमा एक वेगळीच ओळख दाखवणारा आरआरआर हा चित्रपट आहे. चाहत्यांनी त्या चित्रपटाला तसेच 'नाटूनाटू' या गाण्याला मोठी पसंदी दाखवली होती. तसेच गेल्या काही दिवसापुर्वीच चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याला दोन श्रेणीमध्ये पुरस्कार देखील मिळाला आहे. 'ओरिजनल साँगचा अवॉर्ड' (Original Song Award')आणि 'नॅान इंग्लीश लॅग्वेज अवॉर्ड' ('Naan English Language Award') हे दोन पुरस्कार 'नाटू नाटू' या गाण्याला मिळाले आहे. त्यानंतर पुन्हा एकदा 'आरआरआर'ने बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्मसाठी 'क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड' जिंकला आहे.

क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्सच्या (Critics' Choice Awards) अधिकृत ट्विटर हँडलवरून ही आनंदाची बातमी प्रेक्षकांबरोबर शेअर करण्यात आली आहे. "आरआरआर चित्रपटाच्या कलाकार आणि क्रूचे खूप खूप अभिनंदन केले. बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्मसाठी क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड जिंकला आहे," असं ट्वीटमध्ये म्हटलंय. या ट्वीटबरोबर रामचरणचा (R Ramcharan) फोटो असलेलं एक पोस्टरही ट्वीट करण्यात आलं आहे. गेल्या आठवड्यात 'नाटू नाटू' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा 'गोल्डन ग्लोब पुरस्कार' मिळाल्यानंतरचा हा दुसरा मोठा विजय आहे. या चित्रपटाला 'सर्वोत्कृष्ट चित्र', 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक', 'सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपट', नाटू नाटूसाठी सर्वोत्कृष्ट गाणे आणि 'सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स'सह 'क्रिटिक्स चॉईस' पुरस्कारांसाठी पाच नामांकन मिळाले होते. आणि हा चित्रपट 2022 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट आहे.

'RRR' मध्ये राम चरण आणि 'ज्युनियर NTR' मुख्य भूमिकेत आहेत आणि अजय देवगण (ajay devgn) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) प्रमुख भूमिकेत आहेत. आलिया राम चरणच्या बालपणीच्या मित्राच्या आणि प्रियकराच्या भूमिकेत होती आणि तिने कथेत महत्त्वाची भूमिका साकारली होती. 'RRR' ही काल्पनिक कथा दोन तेलुगू स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या जीवनावर आधारित आहे.

Updated : 16 Jan 2023 10:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top