Home > व्हिडीओ > आर्चीची डुप्लिकेट पाहिलीय का ? "मिनी आर्चीच "

आर्चीची डुप्लिकेट पाहिलीय का ? "मिनी आर्चीच "

आर्चीची डुप्लिकेट पाहिलीय का ? मिनी आर्चीच
X

नागराज मंजुळे याच्या सैराटनं महाराष्ट्रासह संपूर्ण बॉलीवूडलाच वेड लावलं होतं. त्यावर सोशल मीडिया भरपूर कंटेंट तयारही झाला. या चित्रपटातील आर्ची-परशाचे डॉयलॉग तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. त्याच सैराटची झिंग अजूनही कमी झालेली नाही. कसं काय तर पाहा हा व्हिडिओ...

सैराट मधले हे डॉयलॉग म्हणणारी मुलगी तुम्हाला लहानपणीची आर्ची वाटली असेल...पण ही आहे सलोनी...सैराटमधले सर्वच डॉयलॉग अगदी तोंडपाठ...अहो नुसते तोंडपाठ नाही तर आवाज, संवादफेक अगदी आर्चीसारखीच...म्हणूनच तर तिला सध्या ‘मिनी आर्ची’ म्हणून लोकं ओळखू लागले आहेत. छोट्या सलोनीवर आर्चीचा इतका प्रभाव आहे की, जवळपास तिच्या इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये सैराटमधील आर्चीचे सर्व संवाद तिनं रिक्रिएट केले आहेत... सैराटमधील शाळेतील सीन मध्ये आर्ची जसे बोलते तसेच हावभाव आणि हातवारे सलोनी करताना दिसत आहे.

कुठलाही चित्रपट हिट झाला की त्याचा सिक्वेल येण्याची एक परंपरा आपल्याकडे आहे. सैराट प्रचंड हिट झाला मात्र त्याचा सिक्वेल काही आला नाही. मात्र, सलोनीनं आर्चीची केलेली एक्टिंग पाहून नेटिझन्सनी नागराज मंजुळेलाच साद घातलीय. सैराट २ मध्ये हिलाच घ्या, असं म्हणत नेटिझन्सनी सलोनीच्या अभिनयाला दाद दिली आहे. . तुम्हाला काय वाटतं ? सलोनी भालेराव बद्दल आणि तिच्या ऍक्टिंगबद्दल नक्की कळवा...

Updated : 9 July 2023 9:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top