शकीला नॉट अ पॉर्न स्टार चा ट्रेलर लॉंच
दाक्षीणात्य अल्डट स्टार शकीलाची भूमिका रिचा चढ्ढा ने साकारली आहे..
X
दाक्षीणात्य अभिनेत्री शकीलाच्या जिवनावर आता चित्रपट येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रसिध्द झाला. शकीलाच्या मुख्य भुमीकेत अभिनेत्री रिचा चढ्ढा दिसणार आहे. चित्रपटात शकीला यांच्या आयुष्यात आलेले उतारचढाव दाखवण्यात आले आहेत आणि कशाप्रकारे त्या पुन्हा उभ्या राहात यशस्वी होतात आणि कसे पुन्हा त्यांचे आयुष्य फिरते हे चित्रित करण्यात आले आहे.
'शकीला' चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात ही सिल्क नावाच्या अभिनेत्रीने आत्महत्या केल्याचे दाखवल्याने झाली आहे. तिच्या निधनानंतर तिची जागा पॉर्न स्टार शकीला घेते. त्यानंतर तिची ओळख पंकज त्रिपाठीशी होते. पंकज त्रिपाठी हे चित्रपटात एक यशस्वी अभिनेत्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. पॉर्न स्टार ते सुपरस्टार असा शकीलाचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.
हिंदी सोबतच हा चित्रपट हिंदीसह तामिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषेत 1000 स्क्रिन्सवर रिलीज होणार आहे. लॉकडाऊनमुळे बंद असलेले थिएटर आता सुरु झाले आहेत. थिएटर सुरु झाल्यानंतर रिलीज होणारा 'शकीला' हा तिसरा चित्रपट आहे.