Home > Entertainment > रेश्मा खातू तिच्या वडीलांचा वारस पुढे नेणार..

रेश्मा खातू तिच्या वडीलांचा वारस पुढे नेणार..

रेश्मा खातू तिच्या वडीलांचा वारस पुढे नेणार..
X

विजय खातू यांनी मुंबईतील लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ (गणेश गल्ली), चिंचपोकळीचा चिंतामणी, चंदनवाडी, तुळशीवाडी आणि खेतवाडी मंडळांसाठी गणेश मूर्ती बनवल्या. राज्य सरकारकडून त्यांना ‘सर्वोत्कृष्ट मूर्तिकार’या किताबाने देखील गौरविण्यात आले होते. विजय खातू हे २५ फूट किंवा त्याहून अधिक उंचीच्या शेकडो गणेशमूर्ती बनवण्यासाठी प्रसिद्ध होता.

खातू यांनी मोठ्या मूर्तींचा ट्रेंड प्रत्यक्षात आणला. "त्यांच्या गणेश मूर्तींमध्ये त्यांच्या कलाकृतीची ट्रेडमार्क शैली होती. भव्य डोळे असलेले रुंद कपाळ जे हजार शब्द बोलते. खातू यांच्या निधनाने शिल्पकलेच्या जगात एक पोकळी निर्माण झाली आहे. खातू यांनी 1997 आणि 1998 मध्ये लालबागचा राजाची मूर्ती तयार केली होती. अशा भावना अनेक शहरातील कलाकारांनी व्यक्त केल्या.

विजय खातू यांचे काही वर्षान पूर्वी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अचानक निधन झालेल्या कला क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली होती. पण त्यांचा हा वारसा आता त्यांची मुलगी रेश्मा खातू पुढे घेऊन जात आहे. शिल्पकार विजय खातू यांची मुलगी रेश्मा म्हणते कि, “मी माझ्या वडिलांचा वारसा पुढे नेण्याचा निर्णय घेतला. मी त्यांचे नाव गायब होताना पाहू शकत नाही. अगदी वडिलांप्रमाणेच आता चिंचपोकळी चिंतामणी ची ट्रॉली मंडपात अवतरणार आहे आणि स्वागताची जोरदार तयारी सूर आहे. असा शब्दात रेश्मा खातू यांनी चिंचपोकळी चिंतामणी या इंस्टाग्राम अकॉउंटवर व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे..Updated : 31 July 2023 6:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top