Home > Entertainment > पद्मश्री पुरस्कार हातात घेऊन रवीना टंडन विमानतळावर आली आणि असं काही घडलं..

पद्मश्री पुरस्कार हातात घेऊन रवीना टंडन विमानतळावर आली आणि असं काही घडलं..

पद्मश्री पुरस्कार हातात घेऊन रवीना टंडन विमानतळावर आली आणि असं काही घडलं..
X

अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर आज त्या मुंबई विमानतळावर आपल्या मुलांसोबत दिसल्या, यावेळचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये रवीना हातात अवॉर्ड पकडताना दिसत आहे. दरम्यान, तिथे उपस्थित असलेल्या काही व्यक्तीने त्यांची मुलगी रशा हिला धक्काबुक्की केली, जे पाहून रवीना टंडनला चांगलाच राग आला.. काय घडलं नक्की या ठिकाणी पाहुयात..

व्हिडिओमध्ये रवीना टंडन विमानतळावरून बाहेर पडत आहे. यावेळी त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. त्याचवेळी काही लोकांनी त्याच्यासोबत सेल्फीही काढले. पण चाहत्यांनी तिच्या मुलांसोबत धक्काबुक्की केल्यावर ती संतापली. व्हिडिओमध्ये रवीना म्हणते, 'कृपया मुलांना धक्का देऊ नका'.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गौरव केला...

रवीनाला भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल देशातील चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च सन्मान देण्यात आला आहे. दिल्लीतील राष्ट्रपती भवनात बुधवारी हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी रवीनाचे संपूर्ण कुटुंब तिच्यासोबत कार्यक्रमाला पोहोचले. चित्रपटांव्यतिरिक्त, रवीना काही वर्षांपासून महिला सक्षमीकरण आणि शिक्षणाशी संबंधित विषयांवरही काम करत आहे. रवीनाशिवाय अलीकडेच ऑस्कर विजेते संगीतकार एमएम कीरावानी यांनाही या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Updated : 6 April 2023 2:03 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top