Home > Entertainment > रणबीर कपूर आणि दीपिका "१० वर्षांनंतर" त्या आठवणीसाठी एकत्र

रणबीर कपूर आणि दीपिका "१० वर्षांनंतर" त्या आठवणीसाठी एकत्र

रणबीर कपूर आणि दीपिका १० वर्षांनंतर त्या आठवणीसाठी एकत्र
X

दीपिका आणि रणबीर यांची जोडी नेहमीच सर्वांच्या आवडती आहे. पण या दोघांची प्रेमकहाणी अर्ध्यात थांबली. पण त्यांनी केलेले चित्रपट आणि सोबतच चाहत्यांच्या मनावर पडलेली छाप आजही तशीच आहे.
त्या दोघांचे अनेक चित्रपट आहेत . पण त्यांचाच हा खास चित्रपट जो दहावेळा पाहिला तरी कंटाळा येत नाही ,असे लोक म्हणतात. तो चित्रपट म्हणजे "YJHD ये जवानी हैं दिवानी " या चित्रपटाचं फॅन क्लब बघितलं तर डोळे विस्फारण्या इतके आहेत . हा चित्रपट सगळ्यांच्याच मनातला एक आवडता चित्रपट आहे. YJHD ने जे यश मिळवलं ते यश आजही लोकांना आठवतं .प्रेक्षकांचे या चित्रपटातील संवाद, या चित्रपटातील नायक ,नायिका यांच्यावर प्रेम निर्माण झाले आणि या चित्रपटापासूनच दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर यांची जोडी सगळ्यात जास्त लोकांना आवडायला लागली. आज या चित्रपटाला दहा वर्षे पूर्ण झाले आहेत. 2013 मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट 2023 मध्ये दहा वर्षांचा झालाय आणि या निमित्ताने या चित्रपटातील सगळे कलाकार एकत्र आले आहेत . हे आहेत काही फोटो.दहा वर्षांपूर्वीचे या चित्रपटातील दीपिका पदुकोण आणि रणवीर चे काही फोटो पाहिले तर रणवीर मधला बदल आपल्याला कळून येतो.बऱ्याच जणांच्या आयुष्यात असे मित्र असतात आणि अशा कहाण्या सुद्धा घडतात आणि त्यामुळेच लोकांच्या मनातील कथा या चित्रपटामधून दिसली . त्यामुळेच YJHD हा चित्रपट लोकांनी उचलून धरला होता .
तुम्हाला या चित्रपटाबद्दल काय वाटत हे प्रतिसादात नक्की कळवा .

Updated : 1 Jun 2023 9:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top