Home > Entertainment > आणि...अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने कंडोमचे पाकीट फोडले...

आणि...अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने कंडोमचे पाकीट फोडले...

आणि...अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने कंडोमचे पाकीट फोडले...
X

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग यांनी इंस्टाग्राम वरती एक फोटो शेअर केला आहे. सध्या या फोटोची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. खरतर मागील दीड वर्षापासून कोरोनामुळे चित्रपट निर्मितीचं काम ठप्प झालं होतं. परंतु आता कोरोनाची परिस्थिती निवळत असताना अनेक नियमांमध्ये आता शिथिलता दिली गेली आहे. त्यामुळे आता अनेक नवीन चित्रपट निर्मितीचे काम सुद्धा सुरू झाला आहे. अभिनेत्री रकुल प्रीत सिंग या देखील आता एका नवीन चित्रपटाचं शूटिंग करत आहेत. याच चित्रपटाच्या संदर्भात त्यांनी एक फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून शेअर केला आहे.

या फोटोमध्ये रकुल प्रीत सिंग यांच्या हातामध्ये एक कंडोमचे पाकीट आहे. आणि या पाकिटावर 'छत्रीवाली' असे लिहिले आहे. या फोटोला त्यांनी "कोणत्याही हवामानाशिवाय पाऊस पडू शकतो तुमची छत्री तयार ठेवा. "छत्रीवाली" चा फर्स्ट लूक शेअर करत आहे असं कॅप्शन लिहिला आहे.

छत्रीवाली या चित्रपटाचे शूटिंग लखनऊमध्ये सुरू झाले असून या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिकेत रकुल प्रीत सिंग व्यतिरिक्त सुमित व्यास, सतीश कौशिक, राजेश तैलंग, प्राची शाह आणि रिवा अरोरा हे कलाकार असणार आहेत.

Updated : 15 Nov 2021 9:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top