Home > Entertainment > राखी सावंतचा नवरा कोण आहे ?

राखी सावंतचा नवरा कोण आहे ?

राखी सावंतचा नवरा कोण आहे ?
X

अभिनेत्री राखी सावंतने पती रितेशसोबत बिग बॉस 15 च्या घरात प्रवेश केला आहे. अलीकडेच, BigBoss 15' चा एक नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये राखी माधुरी दीक्षितच्या 'मेरा पिया घर आया' या प्रसिद्ध गाण्यावर नाचताना दिसत आहे आणि त्यानंतर तिने रितेशचे घरात स्वागत केले आहे. राखी आणि तिच्या पतीसोबत, अभिनेत्री रश्मी देसाई आणि देवोलिना भट्टाचार्जी देखील वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून दिसणार आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर शोचा प्रोमो शेअर करताना चॅनलने लिहिले, "राखी सावंतचा नवरा अखेर बिग बॉसमध्ये प्रवेश करत आहे का? जाणून घेण्यासाठी 'बिग बॉस 15' पहा." प्रोमो व्हिडिओमध्ये राखी (Rakhi Sawant ) कॅमेऱ्याकडे बघते आणि म्हणते, "तुम्ही लोक मला वारंवार खोटे बोलले की माझे लग्न झाले नाही. मी म्हणाले होते की माझा पती रितेश येथे येणार आहे. म्हणून मी रितेशसोबत आले आहे."


2019 मध्ये राखी आणि रितेशचे कोर्ट मॅरेज झाले होते.

राखीने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले की, तिला बिग बॉसच्या घरात पुन्हा लग्न करायचे आहे. राखी आणि रितेश यांनी २०१९ मध्ये कोर्ट मॅरेज केले होते. राखी तिसऱ्यांदा बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून दिसणार आहे. रितेश हा UK मध्ये राहणारा NRI व्यापारी आहे. राखी आणि तिचा पती रितेश यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री पाहणे मजेशीर असेल.

Updated : 28 Nov 2021 3:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top