Home > Entertainment > "लस घेताना हे गाण म्हणा त्रास होणार नाही"

"लस घेताना हे गाण म्हणा त्रास होणार नाही"

लस घेताना राखीने केलं नव्या गाण्याचं प्रमोशन

लस घेताना हे गाण म्हणा त्रास होणार नाही
X

बॉलीवूडमध्ये ड्रामाक्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंतने कोविड प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. याचा व्हिडीओ तिने इंस्टाग्रामवर शेअर केला असून यात तिने "लस घेताना हे गाण म्हणा त्रास होणार नाही" असं म्हटलं आहे.

या व्हिडीओमध्ये अभिनेत्री रुग्णालयात बसलेली दिसत आहे. जिथे तिने कोव्हिशील्ड लसीचा पहिला डोस घेतला आहे. पण इंजेक्शन घेताना राखी खूप घाबरली होती. यावेळी ती सतत तिच्या नवीन गाण्याचे प्रमोशन करत होती. राखी सावंत यांच्या नवीन गाण्याचे नाव आहे 'तेरे ड्रीम मे मेरी एंट्री, मेरे ड्रीम मे तेरी एंट्री', जे गाणे ती सतत गात होती. त्याने या व्हिडीओमधील नर्सला विचारले की, लस घेताना मला काही त्रास होणार नाही ना? दरम्यान, ती सतत तिच्या नवीन गाण्याचे प्रमोशन करत होती.

राखीने व्हिडीओ शेअर करत 'मी करोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. आता तुम्ही माझ्या आगामी व्हिडीओची वाट पाहा' असे कॅप्शन दिले आहे. अनेकांनी तिच्या या फोटोवर कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पाडला आहे. विंदु दारा सिंह यांनी राखीच्या या व्हिडीओवर कमेंट केली आहे. एका यूजरने कमेंट करत 'तू प्रत्येक परिस्थितीमध्ये कमाल करतेस' असे म्हटले आहे.

Updated : 18 Jun 2021 1:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top