Home > Entertainment > राखी सावंत आणि आदिल खानचा,प्रेमापासुन ते ब्रेकअप पर्यंतचा प्रवास

राखी सावंत आणि आदिल खानचा,प्रेमापासुन ते ब्रेकअप पर्यंतचा प्रवास

राखी सावंत आणि आदिल खानचा,प्रेमापासुन ते ब्रेकअप पर्यंतचा प्रवास
X


ड्रामा क्वीन राखी सावंतचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय असतो. राखी सावंतने आदिल खान दुर्राणीसोबत लग्न केल्याचे मान्य केल्यापासून या दोघांच्या वैयक्तिक आयुष्यातील वाद रोजच मीडियाच्या मथळ्यात आहेत. राखी आणि आदिलमधील वाद आता इतका वाढला आहे की तो मीडियासह पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचला आहे. आदिलला पोलिसांनी राखीच्या एफआयआर अंतर्गत गेल्या दिवशी ताब्यात घेतले होते.

बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतने सांगितले की, तिचा आणि रितेशचा काही महिन्यांपूर्वी घटस्फोट झाला आहे. या दरम्यान, राखीने तिचे आणि प्रियकर आदिल खान दुर्रानीच्या लग्नाचे फोटो शेअर केले होते. हे फोटो सोशल मीडियावर जास्त प्रमाणात व्हायरल झाले. राखी सावंत आणि आदिल यांनी मे 2022 मध्ये कोर्ट मॅरेज केले होते. त्यानंतर त्यांनी लग्न केले. आदिलच्या दबावामुळे राखीने सात महिने आपले लग्न जगापासून लपवून ठेवले. मात्र त्याच्या अफेअरबद्दल समजल्यानंतर राखीने तिच्या लग्नाविषयी सोशल मिडीयीमर सांगितले. त्यावेळीही आदिलने आपण विवाहित असल्याचे मान्य केले नाही.

काही दिवसांच्या नाटकानंतर त्यांनी राखीसोबत लग्न करण्यास होकार दिला. पण आता राखीने अस वक्तव्य केल आहे की आदिल मला सोडून प्रेयसीकडे गेल्याचे म्हटले आहे. राखीने ओशिवरा पोलिस ठाण्यात पती आदिल खानविरोधात तक्रार दाखल केली आहे. आदिलला पोलिसांनी ७ फेब्रुवारीला आपल्या ताब्यात घेतले आहे. राखीने अटकेनंतर आदिलवर गंभीर आरोपही केले आहे. राखीला मारण्यासाठी आदिल तिच्या घरी गेल्याचे तिने सांगितले. आता राखीचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आदिलविषयी सांगताना ती अचानक चक्कर येवून पडते.त्यामुळे राखी सावंत आणि आदिल खानच्या लव्हस्टोरीचा हा प्रवास नेहमीप्रमाणेच चर्चेत आलेला आहे .

Updated : 8 Feb 2023 10:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top