Home > Entertainment > "आई बाबांना सरप्राईज द्यायला गेले आणि त्यांनी पर्समधील गर्भनिरोधक गोळ्या पाहिल्या", अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा...

"आई बाबांना सरप्राईज द्यायला गेले आणि त्यांनी पर्समधील गर्भनिरोधक गोळ्या पाहिल्या", अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा...

आई बाबांना सरप्राईज द्यायला गेले आणि त्यांनी पर्समधील गर्भनिरोधक गोळ्या पाहिल्या, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा...
X

नवोदित अभिनेत्री राधिका मदान हिने फार कमी वयात तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. छोट्या पडद्यापासून सूरूवात करून रूपेरी पडद्यापर्यंत यशस्वी मजल मारली आहे. असं असलं तरी तिला सुरूवातीच्या काळात संघर्ष हा करावाच लागला होता. चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या पहिल्याच दिवशी तिला दिग्दर्शकाने गर्भनिरोधक गोळ्या आणायला सांगितल्या होत्या. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने हा धक्कादायक खुलासा केला आहे.

राधिका ही नेहमीच तिच्या हटके भूमिकांसाठी ओळखली जाते. तिचा स्वभावही बिनधास्त आहे. ती सोशल मीडियावरही कायम सक्रीय असते. अशाच एका मुलाखतीदरम्यान तिने तिच्या शूटींगचा एक किस्सा सांगितला आहे. राधिका म्हणाली की, 'माझा शूटिंगचा पहिला दिवस होता आणि पहिल्याच दिवशी मला गर्भनिरोधक गोळी खरेदी कराव्या लागल्या होत्या. जेव्हा दिग्दर्शकाने मला गर्भनिरोधक गोळी खरेदी करण्यास सांगितली तेव्हा मला थोडं आश्चर्य वाटलं. पण तो चित्रपटातील माझा पहिला शॉट होता, त्यामुळे मला त्या गोळ्या घ्याव्या लागल्या.

"यानंतर मी आई-बाबांना सरप्राईज देण्यासाठी घरी गेले होते. त्यांना बघितल्यानंतर मला फार आनंद झाला. मात्र त्याचवेळी त्यांनी त्या गोळ्या पाहिल्या. तेव्हा त्यांना जरा धक्का बसला. कारण हा सर्व प्रकार माझ्या पालकांसाठी फार धक्कादायक होता. त्यावेळी माझे वडिल त्या गोळ्यांकडे फक्त बघत होते. पण ते काहीही बोलले नाहीत", असे राधिका मदान या मुलाखतीमध्ये म्हणाली.

राधिकाने 'मेरी आशिकी तुमसे ही' या मालिकेतून अभिनयास सुरुवात केली होती. यावेळी राधिकाचं वय फक्त १९ वर्ष होतं. तर 'फटाखा' या सिनेमातून राधिकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. दिवंगत अभिनेता इरफान यांच्यासोबत राधिका 'अंग्रेजी मीडियम' या सिनेमातही झळकली होती.Radhika

Updated : 3 Feb 2022 6:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top