Home > Entertainment > राधा ही बावरी "फिल्म अभिनेत्री श्रुती मराठे ने कास्टिंग काऊच बद्दल केला धक्कादायक खुलासा.

राधा ही बावरी "फिल्म अभिनेत्री श्रुती मराठे ने कास्टिंग काऊच बद्दल केला धक्कादायक खुलासा.

राधा ही बावरी फिल्म अभिनेत्री श्रुती मराठे ने कास्टिंग काऊच बद्दल केला धक्कादायक खुलासा.
X

"राधा ही बावरी"या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्रुती मराठीने एका मुलाखतीमध्ये तिला आलेल्या कास्टिंग काउच बद्दल आलेल्या वाईट अनुभवाचा धक्कादायक खुलासा केला आहे.

एका न्यूज वेबसाईट ची मुलाखत देताना श्रुती मराठे ने याबाबत धक्कादायक खुलासा करत याबद्दल तिने सांगितले की मला एका निर्मात्याने विचारले की तुमच्या चित्रपटाचे मानधन किती?मी त्यांना ठराविक रक्कम सांगितले तो निर्माता मला म्हणाला की 'जर माझ्या इच्छा पूर्ण केल्यास', किंवा माझ्याबरोबर कॉम्प्रोमाईज केल्यास तुला ही ठराविक रक्कम नक्कीच मिळेल.





मी स्तब्ध झाले दोन-तीन मिनिट मला काय बोलावे हे कळालेच नाही.दोन-तीन मिनिटानंतर मी त्याला म्हणाले की जर मी तुझ्यासोबत झोपले तर तुझी बायको मुख्य अभिनेत्यासोबत सोबत झोपणार का.असे त्यानंतर तो निर्माता चिडला चिडून तो मला म्हणाला की काय बोलताय तुम्ही. मी त्याला म्हणाले की यापुढे बोलताना थोडा विचार करून बोला.

असा वाईट अनुभव अभिनेत्री श्रुती मराठे ने सांगितला असून मराठी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा कास्टिंग काऊच चे प्रकार घडतात का?असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

Updated : 18 Jan 2024 6:23 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top