Home > Entertainment > Valentine day प्रेम फक्त एकदाच होतं का?

Valentine day प्रेम फक्त एकदाच होतं का?

Valentine day प्रेम फक्त एकदाच होतं का?
X

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा नवीन सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं तू झुठी मैं मक्कार असं नाव आहे. खरंतर रणबीर कपूर खूप दिवसानंतर या प्रकारच्या रोलमध्ये दिसणार आहे .आपल्याला माहीतच आहे, "ये जवानी है दिवानी" त्याचबरोबर "अजब प्रेम की गजब कहाणी " ,तमाशा या सिनेमांमधून त्यांनी त्याच्या अभिनयाचे वेगवेगळे पैलू दाखवले आहेत आणि आता तू झुठी मैं मक्कार या सिनेमामध्ये पण असंच काहीसं पात्र रणबीर कपूर ने साकारला आहे.

या सिनेमातील "प्यार होता कई बार है" हे गाणं सध्या ट्रेनिंगला आहे .अवघ्या 23 तासात 28 मिलियन इतक्या विव्हज या गाण्याला आल्या आहेत .अरजीत सिंग चा आवाज ,अभिजीत भट्टाचार्य चे लिरिक्स आणि रणवीर कपूर चा डान्स या तिन्हींची जादू या गाण्यात दिसून येत आहे . पुन्हा एकदा रणबिर कपूर त्याच्या जुन्या स्टाईलने एन्ट्री मारताना दिसत आहे. त्यामुळे प्रेक्षका सुद्धा "रणबिर इज बॅक" म्हणत कौतुक करत आहेत. या सिनेमात श्रद्धा कपूर रणबीर सोबत दिसणार आहे.हा सिनेमा व्हॅलेंटाईन वीक मध्ये जास्त चर्चेत आहे .कारण यातील गाणी ही तरुणाईला वेड लावणारी ठरत आहेत .आठ मार्चला हा सिनेमा रिलीज होणार आहे पण त्याआधी व्हॅलेंटाईन वीक मध्ये प्रसिद्ध झालेली ही गाणी सोशल मीडियावर धुमाकूळ माजवत आहेत.

रणबीर कपूर याचे लोकप्रिय सिनेमे कोणते ?

१)ये जवानी है दिवानी

२)संजू

३)बर्फी

४)ब्रम्हास्त्र

५)रॉकस्टार

६)अजब प्रेम कि गजब कहाणी

७)राजनीती

८)ये दिल है मुश्किल

९)तमाशा

१०)Wake up sid

Updated : 11 Feb 2023 7:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top