Home > Entertainment > प्राजक्ता माळीचा 'भिशी मित्र मंडळ': मराठी मनोरंजनाची नवी लाट!

प्राजक्ता माळीचा 'भिशी मित्र मंडळ': मराठी मनोरंजनाची नवी लाट!

प्राजक्ता माळीचा भिशी मित्र मंडळ: मराठी मनोरंजनाची नवी लाट!
X

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, होस्ट आणि बिझनेसवुमन प्राजक्ता माळी लवकरच 'भिशी मित्र मंडळ' नावाच्या नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सारख्या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी प्राजक्ता या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

नुकतेच प्राजक्ताने सोशल मीडियावर 'भिशी मित्र मंडळ' चित्रपटाच्या मुहूर्ताचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्राजक्तासोबतच चित्रपटाचे निर्माते, लेखक आणि दिग्दर्शकही दिसत आहेत. '२०२४ हे वर्ष मला खूप बिझी ठेवणार अशी शक्यता आहे. मी पोस्ट कोल्हापूरातून लिहितेय. माझ्या नव्या प्रोजेक्टसाठी मी खूपच उत्सुक आहे,' असे कॅप्शन प्राजक्ताने व्हिडीओसोबत दिले आहे.

'भिशी मित्र मंडळ' हा चित्रपट भिशी या संकल्पनेवर आधारित आहे. भिशी म्हणजे, ग्रुपमधील सदस्य प्रत्येक महिन्याला ठराविक पैसे एकत्र करून टप्प्याटप्प्याने सर्व सदस्यांना पैसे वापरायला देतात. हा प्रकार विशेषत: महिला, कामगार आणि व्यापाऱ्यांमध्ये अधिक प्रचलित आहे.

चित्रपटाची कथा काय आहे आणि प्राजक्तासोबत कोणकोणते कलाकार दिसणार याची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. तरीही, 'भिशी मित्र मंडळ' हा एक धमाल, कॉमेडी आणि निखळ मनोरंजक चित्रपट असणार यात शंका नाही.

Updated : 12 Feb 2024 8:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top