Home > Entertainment > प्राजक्ता माळी झाली ‘आश्रमवासी’

प्राजक्ता माळी झाली ‘आश्रमवासी’

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्री प्राजक्ता माळीने मराठी कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. छोट्या पडद्यासह मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते.

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ता सोशल मिडियावर खुप सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांसोबत कनेक्ट असते. तिने अनेक चित्रपटाच्या माध्यमातुन चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. तिच्या कामाबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत करते. प्राजक्ताचं करिअर सध्या सुसाट सुरु आहे.

करिअरच्या शिखरावर असताना प्राजक्ता माळी सध्या आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स करतेय. ती सध्या आपल्याला महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात निवेदन करतांना दिसते. शूटिंग मधून वेळ काढून तिने एका खास जगही जगायचे ठरवले. म्हणजेच 'आश्रमात' प्राजक्ताचं करिअर सध्या सुसाट सुरु आहे. करिअरच्या शिखरावर असताना प्राजक्ता माळी सध्या आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स करतेय. आयुष्यात कितीही घरं-दारं झाली; तरी आर्ट ॲाफ लिव्हींग चं आश्रम माझं सगळ्यात आवडतं ठिकाण होतं आणि असेल, असं म्हणत प्राजक्तानं आश्रमातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. कधीही आश्रमवासी होऊ शकते असंही प्राजक्तानं म्हटलं होतं.

Updated : 26 July 2023 8:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top