Home > Entertainment > हॉट मॉडेलचा फोटो लाइक केला म्हणून धर्मगुरु पोप फ्रान्सिस ट्रोल

हॉट मॉडेलचा फोटो लाइक केला म्हणून धर्मगुरु पोप फ्रान्सिस ट्रोल

हॉट मॉडेलचा फोटो लाइक केला म्हणून धर्मगुरु पोप फ्रान्सिस ट्रोल
X

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या युजर्सच्या नजरेतून कोणीच सुटू शकत नाहीत. ख्रिस्ती धर्मगुरु पोप फ्रान्सिस पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत. पोप फ्रान्सिस यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एका मॉडेलचा बिकीनी फोटो लाईक करण्यात आला. अशा प्रकारचा फोटो धर्मगुरुंनी लाईक केल्यामुळे जगभरात चर्चेचा विषय झाला आहे.

3 डिसेंबर रोजी 'मार्गोट' नावाच्या एका बिकिनी मॉडेलने ट्विटरवर स्क्रीनशॉट शेअर करुन पोप यांनी आपला फोटो लाइक केल्याचा दावा केला आहे. तिने शेअर केलेला स्क्रीनशॉट आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. स्क्रीनशॉट शेअर करताना, "uhhh, पोप यांनी माझा फोटो लाइक केला?? पोप यांनी माझा फोटो लाइक केला म्हणजे मी आता स्वर्गात जाणार…", असं मजेशीर ट्विट मार्गोटने केलं आहे.

कॅथलिक न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार पोप फ्रान्सिस यांची सोशल मीडिया अकाऊण्ट्स एका टीमद्वारे हँडल केली जाते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी अंतर्गत समिती स्थापन करण्यात आली आहे. पोप फ्रान्सिसच्या इन्स्टाग्राम अकाऊण्टला 74 लाख फॉलोअर्स आहेत. मात्र या अकाऊण्टवरुन कोणालाही फॉलो केले जात नाही. पोपच्या ट्विटर अकाऊण्टवर 1 कोटी 88 लाख फॉलोअर्स आहेत.


Updated : 24 Dec 2020 5:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top