Home > Entertainment > parineeti chopra and raghav chadha engagement..

parineeti chopra and raghav chadha engagement..

parineeti chopra and raghav chadha engagement..
X

आप खासदार राघव चड्ढा आणि बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा 13 मे रोजी लग्न करणार आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, रिंग सोहळा दिल्लीत होणार आहे. यासाठी राजकारण आणि चित्रपट क्षेत्रातील सुमारे दीडशे लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे.

मात्र राघव किंवा परिणीती यापैकी कोणीही या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. आज सकाळी दोघांना मुंबई विमानतळावर स्पॉट केले गेले, तेथून त्यांनी दिल्लीला जाण्यासाठी फ्लाइट घेतली. गेल्या एका महिन्यात दोघेही अनेकदा एकमेकांसोबत जेवायला गेले आहेत. काही दिवसांपूर्वी दोघेही मोहाली क्रिकेट स्टेडियमवर एकत्र दिसले होते.

दोघांचे कुटुंब एकमेकांच्या संपर्कात आहेत...

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दोघांचे कुटुंबीय गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. ते आपापल्या कामात व्यस्त असले तरी त्यामुळे तारीख जाहीर होण्यास वेळ लागत होता. आता हे जवळपास निश्चित झाले आहे की दोघेही 13 मे रोजी कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत एंगेजमेंट करणार आहेत.

Updated : 10 May 2023 8:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top