Home > Entertainment > कांद्याच्या पातीचा स्कर्ट ,कोबीच्या पानांचा टॉप ,उर्फीनंतर आता ही कोण?

कांद्याच्या पातीचा स्कर्ट ,कोबीच्या पानांचा टॉप ,उर्फीनंतर आता ही कोण?

कांद्याच्या पातीचा स्कर्ट ,कोबीच्या पानांचा टॉप ,उर्फीनंतर आता ही कोण?
X


फॅशन ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाच्या नजरेत पडतेच.अनेक अभिनेत्रींच्या कपड्यावरून बरेच ट्रेंड सुरू होतात.आणि मग सोशल मीडिया वर सुद्धा हाच ट्रेंड येतो

विचित्र प्रकारचे कपडे परिधान करून अनेक सेलिब्रिटी ट्रोल तर होतातच पण उर्फी जावेद सारख्या अनेक मॉडेल स आपल्याला आता ट्रेंड मध्येदिसतात

आता अशीच एका अभिनेत्रीची पोस्ट सध्या व्हायरल होतेय .निकिता रावल असे या अभिनेत्रींचे नाव आहे .अनेक बॉलिवूडच्या चित्रपटांमधून तिने तिची कला सादर केली आहे.निकिता कॉलेज मध्ये असतानाच एका दिग्दर्शकाने तिच्यातील टॅलेंट ओळखून अल्बमच्या गाण्यासाठी लाँच केलं होतं .त्यांनतर तिने तिचं सौन्दर्य आणि कलेचा मेळ साधत बॉलिवूडमध्ये नाव कमावलं आहे .

सध्या तिच्या हटके अंदाजामुळे ती सोशल मीडियावर नेहमी चर्चेत राहते. ही पोस्ट तुम्ही पहिली असाल तर यामध्ये कोबीच्या पानांचा टॉप तर कांद्याच्या पातीपासूनचा तिचा स्कर्ट तिने परिधान केला आहे .आता उर्फी जावेदला टक्कर देणार की काय? अशी चर्चा सुरू आहे. या फोटो बरोबरच न्यूज पेपर परिधान केलेले तिचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते.

त्यामुळे सोशल मीडियावर ट्रेंडींग मध्ये येण्याची ही पद्धत बऱ्याचदा लोकांचं लक्ष वेधून घेत आहे .

Updated : 12 Jan 2023 9:52 AM GMT
Next Story
Share it
Top