Home > Entertainment > नागराज मंजुळे दिगदर्शित 'झुंड' होणार रिलीज; अमिताभ बच्चन यांनी ट्विट करता जाहीर केली तारीख..

नागराज मंजुळे दिगदर्शित 'झुंड' होणार रिलीज; अमिताभ बच्चन यांनी ट्विट करता जाहीर केली तारीख..

नागराज मंजुळे दिगदर्शित झुंड होणार रिलीज; अमिताभ बच्चन यांनी ट्विट करता जाहीर केली तारीख..
X

अमिताभ बच्चन यांच्या 'झुंड' या नवीन चित्रपटाची नवीन रिलीज डेट समोर आली आहे. खुद्द अमिताभ यांनी या चित्रपटाचे नवे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली आहे. पोस्टरच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, स्पर्धा करण्यासाठी तयार राहा. आमची टीम येत आहे. 'झुंड' 4 मार्च 2022 रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.


नागराज पोपटराव मंजुळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात बिग बी स्लम सॉकरचे संस्थापक विजय बारसे यांची भूमिका साकारत आहेत. तो एका प्रोफेसरच्या भूमिकेत आहे जो झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉल संघ तयार करण्यासाठी प्रेरित करतो आणि त्यांना जीवनाचा उद्देश देतो. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी देखील या चित्रपटाच्या रिलीज संदर्भात ट्विट केलं आहे. त्यांनी ट्विट मध्ये म्हंटल आहे की, '' झुंड सिनेमा 4 मार्च ला सिनेमागृहात तुमच्या भेटीसाठी येत आहे..

Updated : 2 Feb 2022 10:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top